पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१९ व जवळ असलेल्या रानांतून झाडे तोडून त्याने त्या दऱ्या भरून काढल्या. चार दिवसांत किल्ल्याच्या सपाटीइतकी उंच असलेली एक शेजारची टेकडी त्याने काबीज केली. किल्ल्यावरील लोकांनी हैं विलक्षण कृत्य पाहिले तेव्हां ते आश्चर्यचकित झाले व त्यांनी तहाचे बोलणे सुरू केले. दरम्यान काळोख्या रात्री पळून जाण्याचा त्यांनी घाट घातला. परंतु शिकंदराचे नजरेस ही गोष्ट येतांच त्यांचा पाठलाग त्याने केला व बहुत लोकांची कत्तल केली. आजपर्यंत हा किल्ला कोणत्याही शत्रूने घेतला नव्हता. किल्ल्याचा बंदोबस्त करून शिकंदर अटक शहराकडे निघाला. तेथे जवळच तक्षशिलानामक नगर होते. तेथील राजाकडून त्यांजकडे वकील आले. त्यांनी तीस हत्ती, तीन हजार पुष्ट बैल, दहा हजारांवर शेळ्या मेंढ्या व दोनशे चांदीची नाणी नजर केली आणि शिकंदराचे स्वामित्व कबूल केले. आणि ३२६ सालच्या मार्च महिन्यांत, शिकंदर बादशाहाने सिंधु नदी उतरून हिंदुस्थानच्या जमिनीवर पाऊल टाकले. अभिसारच्या राजाने वकील पाठविले. पुढे पोरसनामक राजाचे राज्य लागले. पोरस राजाही दुसऱ्या राजांप्रमाणे आपणास शरण येईल असे वाटून शिकंदराने त्याला निरोप पाठविला. पोरस राजानें क्षत्रियास योग्य असें उत्तर पाठविले. तो म्हणाला, “ मी आपल्या भेटीस सरदद्दीवर येतो, तो लढाई करण्याकरितां येतो." तक्षशिला येथे आपल्या फौजेला काही दिवस विसावा देऊन पोरसशी सामना करण्याकरितां पूर्व दिशेकडे त्याने कूच केलें. मे महिन्याच्या आरंभी तो झेलम येथे येऊन पोचला. बर्फ वितळल्यामुळे त्या नदीला पूर आला होता. सिंधु नदी उतरण्याकरितां ज्या नावा तयार केल्या होत्या त्याच नांवा ही नदी म्हणजे हिदस्पीज उर्फ वितस्ता ऊर्फ झेलम उतरण्यास आणविल्या. तो