Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

वृत्तांत सांगणे जरूर आहे. ती गोष्ट म्हणजे शिकंदरबादशहाची हिंदुस्थानावर स्वारी ही होय. भाग ३ रा. शिकंदर बादशाहाची स्वारी. इराणचा राजा दरायस ह्याचा इसॉस व गौगमेला या दोन लढायांत पूर्ण पराभव करून ग्रीस देशांतील मोसीडोनिआ प्रांतांचा राजा आलेक्झांडर ज्यास आपण शिकंदर म्हणतों तो शिकंदर बादशाहा हिंदुस्थान जिंकण्यास ख्रि.पू.३२७ साली निघाला. त्याच्या बरोबर निदान ५०।६०हजार ग्रीस देशांतील लोकांची फौज होती. वाटेत हिंदुकुशासारखे मोठमोठाले पर्वत चढून व अस्पेशियन, अस्सकेनाय वगैरे लोकांना जिंकून तो सिंधुनदाजवळील डोंगरी किल्ला एओर्नोस घेण्याच्या तयारीस लागला. किल्ल्याची उंची ७००० फूट होती. त्याच्या दक्षिणेस सिंधु नदी आहे; ती तेथे फार खोल आहे. किल्ल्याच्या सभोवार उंच व कठीण डोंगराचे सुळके आहेत. किल्ल्यावर पिण्याचा पाण्याचा पुरवठा चांगला असून शेतीचे उपयोगाची मुबलक जमीन होती. किल्ल्यावर जाण्यास फक्त एकच रस्ता होता. ह्या किल्ल्यास वेढा देण्यापूर्वी आपल्या नेहमीच्या वहिवाटीप्रमाणे शिकंदराने आपल्या फौजेच्या मागील तुकडीचे दळणवळण बिनहरकतीचे व मोकळे करून ठेविले होते. सर्व तयारी झाल्यानंतर थोडी फौज घेऊन शिकंदरानें आसपासची सर्व टेहळणी केली. किल्ल्यावर एकदम हल्ला करणे अशक्य असल्यामुळे, भोंवतालच्या एक दोन दऱ्या भरून काढण्याचा त्याने निश्चय केला;