________________
१७ त्याला सुमारे एक कोटि रुपये वसूल मिळत असे. पुढे दोन शतकां नंतर शिकंदर बादशहाचे स्वारीचे वेळेस या दोन्ही प्रांतांवर हिंदू राजांचा अंमल होता. अजातशत्रूनंतर त्याचा मुलगा दर्शक हा गादीवर बसला ( ख्रि. श. पूर्वी ४७५ ) व त्याच्या नंतर त्याचा मुलगा उदय हा ४५० साली गादीवर बसला. उदयानंतर नंदिवर्धन व महानंदी नांवाचे दोन राजे होऊन शैशुनाग वंशाची समाप्ति झाली. महानंदी याला एका शूद्र स्त्रीपासून महानंद नांवाचा मुलगा झाला. त्याने गादी बळकावली व ख्रि. श. पूर्वी ३७२ ह्या वर्षी नंद वंशाची स्थापना केली. __ ह्या वंशाच्या राजांची खात्रीलायक माहिती मिळत नाही. पुराणांतरी महापद्म व त्याचे आठ मुलगे ह्यांना नवनंद असें म्हटले आहे. परंतु ते राजे लोकांना अप्रिय होते असे दिसते. त्या वंशांतील शेवटच्या राजास ३२२ सालीं चंद्रगुप्त मौर्य याने पदच्युत केले व ठार मारले. चंद्रगुप्ताचे राज्यारोहणापासून मौर्यवंशाच्या कारकीर्दीस आरंभ झाला. मुद्राराक्षस नाटकाचे कथानक या राज्यक्रांतीबद्दलचे आहे. ___ ह्या वंशाच्या राजांची हकीकत देण्यापूर्वी हिंदुस्थानच्या इतिहासांत जी एक चिरस्मरणीय गोष्ट घडून आली व ज्या गोष्टीमलें हिंदुस्थानच्या इतिहासास अगदी नवे वळण लागले, त्या गोष्टीचा १ हा चंद्रगुप्त नंदराजाचा दासीपुत्र होता. त्याची व शिकंदर बादशहाची गांठ पडली होती असे म्हणतात. शिकंदराचे मरणानंतर म्यासिडोनियन अंमलदारांना हिंदुस्थानांतून हांकून देण्यांत चंद्रगुप्ताने बराच पराक्रम दाखविला व पाटलिपुत्राची गादी बळकावण्यापूर्वी वायव्येकडील बराच मुलूख त्याने काबीज केला होता. त्याचा प्रधान प्रसिद्ध चाणक्य ऊर्फ कौटिल्य ऊर्फ विष्णुगुप्त हा होता. उत्तर हिंदुस्थानचे राजांनी चंद्रगुप्तावर स्वारी करण्याचा बेत केला त्या वेळी त्याच्याच युक्तीने तो बेत निष्फळ झाला.