________________
त्याच्या कारकीदाँत जैन धर्माची स्थापना करणारा वर्धमान महावीर व बौद्ध धर्माचा संस्थापक गौतम बुद्ध हे दोघेहि आपआपल्या धर्माचे उपदेश करीत होते. महावीर अजातशत्रूचे राज्याचे आरंभी मृत्यू पावला. तो बिंबीसार राजाचे राणीचा नजीकचा आप्त होता. गौतम बुद्ध ख्रि. पूर्वी ४८७ सालांत मृत्यु पावली. त्याचे मृत्यूचे पूर्वी कोसलचा राजा विरूढ याने त्याचे राहण्याचे गांव कपिलवस्तू काबीज केले व शाक्य लोकांची फार मोठी कत्तल केली. बिंबिसाराचा मुलगा अजातशत्रु हा इ. स. पूर्वी ४९० किंवा ४९५व्या वर्षी गादीवर बसला. ह्या अजातशत्रूने आपल्या बापास ठार मारिलें असा त्याजवर आरोप आहे. तो आरोप खरा असेल किंवा खोटा असेल. परंतु लवकरच त्याच्या आईचा भाऊ कोसल देशचा राजा याचे अजातशत्रूशी युद्ध सुरू झाले. पुढे काही वर्षांनी ( नि० पूर्वी ४०० वर्षांच्या सुमारास ) कौसलचे राज्य नामशेष होऊन मगध राज्यांत सामील झाले, अजातशत्रूने लिच्छवी राज्यही घेतले व त्याने पाटली गावाजवळ एक दुर्ग बांधला. पुढे त्याचा नातू उदय ह्याने शोण नदाच्या काठी पाटलीपुत्र हे प्रसिद्ध नगर वसविलें. हिरण्यवाह असेंही शोण नदाचे नांव आहे. ( सर. रामकृष्णपंत भांडारकरांचा. निबंध.) कुसमपुर ही नाव यार शहराची होती. हल्ली त्याचे नांव पाटणा असे आहे. .. खि. पूर्वी ५२१-४८५ पावेतों इराणचा बादशहा हिस्ता4 स्पीज हा होता. त्याचा मलगा ढरायस हा बिबिसार व अजातशत्र यांचा समकालीन होता. सिंध प्रांत व पजाबचा कांहीं भाग त्या वेळेस दरायसचे ताब्यात होता. त्या प्रांतापासून १ बौद्ध धर्माचा इतिहास एका स्वतंत्र भागांत दिला आहे. २ या शहराची संक्षिप्त हकीकत पुढे दिली आहे. बाल हा होता. त्यामलीन होता