Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/41

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग २ रा. शैशुनाग वंश. महाभारतांत ज्या युद्धाचे वर्णन केले आहे त्या युद्धाच्या कालाबद्दल अद्यापि मतभेद आहे. काही विद्वानांचे म्हणणे तें युद्ध ख्रिस्तापूर्वी ३००० व्या वर्षी झालें. तर काहींचे म्हणणे ते नि. पूर्वी १४०० वर्षी झालें. रा. ब. चिंतामणराव वैद्यांनी प. ३१०२ वर्ष ठरविले आहे. त्या कालापासून तो ख्रि. पूर्वी ६००-७०० वर्षे पर्यंतचा कांहीं विश्वसनीय इतिहासाचा अद्यापपावेतों शोध लागला नाही. त्या वेळेस उत्तर हिंदुस्थानांत १६ राज्ये होती असे डेव्हिस याने ' बुधिस्ट इंडिया' ह्या ग्रंथांत लिहिले आहे. ती राज्ये पेशावर व रावळपिंडी (प्राचीन गांधार) पासून तों उज्जनीपर्यंत होती. ___ त्या वेळेस ह्या देशाच्या पुष्कळ भागांत मोठमोठाली अरण्ये होती. नावलौकिकास आलेले प्रथमचे राज्य कोसल में होतें. त्याची राजधानी हिमालयपर्वताच्या पायथ्याशी रात्पी नदीचे वरचे बाजूस श्रावस्ती नावाची नगरी होती. त्यानंतर मगध देशचे राजे उदयास आले. तेथील पहिला राजवंश शशनाय नांवाचा होता. त्याची राजधानी गंगेजवळच्या राजगृह नावाची होती. त्या वंशाच्या मूळ संस्थापकाची व त्यानंतरच्या तीन राजांची काही माहिती मिळत नाही. पांचवा राजा बिंबिसार ऊर्फ श्रेणिक हा होता. त्याने पूर्वेकडील अंगदेश काबीज केला. आणि कोसल व लिच्छवी घराण्यांतील मुलीशी लग्न लावन आपले वर्चस्व वाढविले. त्याने २८ वर्षे राज्य केले.