________________
धांवरून खोटी ठरली आहे. इ० स० पूर्वी ३०० वर्षांपेक्षां म्हणजे अशोकाचे पूर्वीचा खात्रीचा लेख अद्यापि सांपडत नाही. मि. रॅपसन, कनिंगहम वगैरे ग्रंथकर्त्यांनी जुन्या नाण्यांपासून काय माहिती मिळण्यासारखी आहे, त्याचे विस्तृत वर्णन दिलेलें आहे. ही नाणी सोन्याची, चांदीची व तांब्यांची आहेत. ती हिंदुस्थानांतील सर्व भागांत सांपडतात. त्यांवर ज्या राजांनी ती काढली त्यांची, कधी कधी त्याचे बापांची नांवें व क्वचित् प्रसंगी ती सुरू झाल्याची साले दिलेली आहेत. ( ४ ) बाणकवीचें हर्षचरित्र व बिल्हण कर्वीचे विक्रमांक चरित ह्यांत ऐतिहासिक माहिती मिळते. बंगाल्यांतील पाल राजांची माहिती ज्यांत आहे असें रामचरित्र नांवाचे काव्य अलीकडे सांपडले आहे. तसेच तामिल काव्यांत इ० सनाचे पहिले व दुसरे शतकांतील दक्षिणेतील राजांची माहिती आहे. हिंदस्थानचा इतिहास व्यवस्थितपणे लिहिण्यास एक मोठी अडचण आहे. ती ही की, या देशांत शक किंवा वर्षे देण्याच्या रीती फार भिन्न भिन्न आहेत. कनिंगहॅमचे हिंदुस्थानांतील शकांचे पस्तकांत विसापेक्षा जास्त शकपद्धति दिल्या आहेत, व आणखीही पष्कळ सांपडतील. वेगवेगळे प्रांतांतील वेगवेगळे राजे गादीवर बसले तेव्हापासून किंवा त्यांचे राज्याभिषेकांपासून त्या त्या प्रांतांत वर्षे मोजण्याचे प्रकार आढळतात. त्या सर्वांचा मेळ घालण्यास फार प्रयास पडतात. परंतु विद्वान् शोधकांना या कामांत अलीकडे बरेंच यश आल्यामुळे आतां हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास बऱ्याच व्यवस्थित रीतीने लिहिणे शक्य झाले आहे. समकालीन श्रीक राजांची नांवें समजल्यामुळे, मौर्य वंशाचे राजांचे शकावलीबद्दल आतां शंका राहिली नाही.