पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

त्याचे दृष्टीस पडली. काही लोक रस्त्यांतून अगदी नग्न जात होते व काहींनी आंगांस राख फासली होती. काशीहून ह्युएनत्संग उत्तरेकडे गेला. तिकडे वैशाळी व पाटलीपुत्र ह्या राजधान्या त्याने पाहिल्या. तेथून तो गयेस गेला, परंतु सर्वांत ज्यास्ती मुक्काम त्याने नालंद येथे केला. तेथें तो पांच वर्षे राहिला, व योगशास्त्र, न्यायानुसारशास्त्र, अभिधर्मशास्त्र, हेतुविद्याशास्त्र, शब्दविद्याशास्त्र वगैरे शास्त्रांचा त्याने अभ्यास केला. तेथे दहा हजार यति होते. तेथून तो निघून आसाम, ओरिसा, आंध्र, द्रविड वगैरे प्रांतांत गेला व कोंकण, महाराष्ट्र, गुजराथ, कच्छ, काठेवाड, सिंध इत्यादि प्रांतांतून, हिंदुकुश पर्वतावरून आपल्या देशांत परत गेला. ह्यावरून त्याच्या लेखाचे महत्त्व किती आहे हे ध्यानात येईल. गिझनीच्या महमदाबरोबर अल्बरूनी नांवाचा मुसलमान आला होता. त्याने तहकीत-इ-हिंद नांवाची हकीकत लिहिली आहे. ___पुढे इ० स० १२९५ साली वेनिस शहराचा प्रवासी मार्कोपोलो हा दक्षिण हिंदुस्थानांत आला होता. . (३) पुष्कळ ठिकाणी पर्वतांचे गुहांत, शिलांवर, स्तंभांवर व प्राचीन मंदिरावर कोरीव लेख सापडतात. तसेच ताम्रपटावरील दानलेख आहेत, त्यांवर दान करणारांची व त्यांचे पूर्वजांची नांवें, साले वगैरे दिलेली आहेत. प्राचीन इतिहासाची माहिती अशोक राजाच्या शासनपत्रावरून पुष्कळ मिळते. दक्षिण हिंदस्थानांत सहस्रावधि ताम्रपट व शिलालेख सापडतात. उत्तर हिंदुस्थानांतील सर्वात प्राचीन लेख म्हणजे इ० स० पूर्वी ४५० वर्षांचा असन, तो पिप्रावा गांवीं बुद्धाच्या अस्थि ठेवल्याबद्दलचा आहे अशी एक वेळ समजूत होती, परंतु ती समजूत अलीकडील शो १ एल्फिन्स्टनचा हिंदुस्थानचा इतिहास पृष्ठे २८८-२९९; हेतुविद्या. शास्त्र याचा अर्थ काय हे समजत नाही.