पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

एक इतिहास लिहिला; त्यांतही हिंदुस्थानची माहिती आहे. चिनातून पुष्कळ बौद्ध धर्माचे प्रवासी हिंदुस्थानांत येत असत. त्यांपैकी पहिला फाहिएन हा इ. स. ३९९ सालांत चिनांतून निघाला, तो पंधरा वर्षांनी चिनांत परत गेला. त्याच्या ग्रंथाचें भाषांतर फ्रेंच व इंग्रजी भाषेत झालेले आहे. त्यांत दुसरा चंद्रगुप्त ऊर्फ विक्रमादित्य ह्याच्या राज्याच्या वेळचे राजकीय व सामाजिक स्थितीचे फार मार्मिक वर्णन दिलेले आहे. परंतु सर्वांत उत्तम वर्णन म्हणजे प्रसिद्ध ह्युएनत्सांग याचे आहे. तो हिंदुस्थानांत सुमारे पंधरा वर्षे (इ. स. ६२९-६४५ किंवा ६४६ ) राहिला. तो चिनांतून निवून तातर देशांत आला व वाटेत पुष्कळ देश व शहरे पाहून तारखंड शहरी आला. तेथून जगझार्टिन नदी उतरून तो समरकंदास आला. तेथून हिंदुकुश पर्वत ओलांडून कपिश नगरांत आला. त्या शहरांतील राजा क्षत्रिय होता. तेथे १०० मठ असून त्यांत सहा हजार यति होते. शहराजवळच अशोकाचा पहिला स्तूप त्याचे दृष्टीस पडला. तेथून तो उत्तर हिंदुस्थानांत शिरला. प्रथमतः त्याला लंपा नांवाचे शहर लागले. त्या शहराच्या उत्तरेकडील लोकांस म्लेंछ म्हणत असत. तथून ता नगरहार शहरी आला. ह्या शहराच्या नैर्ऋत्य दिशेस एक गुहा होती; त्या गुहेत बद्ध प्रभनें आपली छाया ठेविली होती. व प्राचीन काळी ती छाया प्रत्यक्ष बद्धाप्रमाणेच दिसत होता, अशा माख्यायिका होती; परंतु त्या विद्वान् प्रवाशाला तसे कांहीं तेथें दिसले नाही. तो प्रवासी तेथून निघून तक्षशिला, मथुरा, कान्यकुब्ज, प्रयाग वगैरे क्षेत्रं पाहून काशीस आला. काशीस बौद्धापेक्षां ब्राह्मणधर्माचेच अनुयायी त्यास जास्त दृष्टीस पडले. तेथे शंभर देवळे होती व शिवाचे अनुयायी दहा हजार हात. तेथें पितळेची शंभर फूट उंचीची महेश्वराची एक मूर्ति