________________
पाली भाषेत दीपवंश व महावंशनामक ग्रंथांत मौर्य वंशाची हकीकत दिली आहे. तसेंच जैन व बौद्ध ग्रंथांतही इसवी सनापूवर्षांच्या पांचव्या व सहाव्या शतकाची माहिती सांपडते. (२) ग्रीस देशांतील आद्य इतिहासकारः हिरोडोटस् यानें हिंदुस्थान व इराण यां संबंधाने माहिती दिली आहे. पर्सिपोलिस शहराजवळ इराणच्या दरायस राजाच्या वेळच्या शिलालेखांत हिंदुस्थानचा उल्लेख आहे. ह्या शिलालेखाचें साल इ० सनापूर्वी ४८६ हे आहे. हिंदुस्थानची विश्वसनीय माहिती शिकंदर बादशाहाच्या स्वारीपासून आहे. ( खि० सनापूर्वी ३२६ ) अरिअन नांवाच्या ग्रीक ग्रंथकाराने शिकंदर बादशहाच्या स्वारीची उत्तम हकीकत लिहिली आहे. त्या बादशाहाचे टॉलेमी व इतर अंमलदारांच्या हकीकतीवरून ती लिहिलेली आहे. सेल्यूकस राजाचा मॅगस्थेनीज नांवाचा वकील चंद्रगुप्त मौर्य राजाकडे होता. त्याने पुष्कळ तपशीलवार माहिती दिली आहे. चिनी इतिहासकार सुमाचियेन ह्याने इ. स. पूर्वी १०० वर्षे पहिले पुराण इ० स० चे दुसरे शतकांत तरी निदान म्हणजे आंध्र राजा यज्ञश्री याचे वेळेस झाले असावें. इ० सनापूर्वी चवथ्या शतकांत चाणक्याने अर्थशास्त्र नांवाचा ग्रंथ लिहिला आहे. त्यांत तो राजांस इतिहास, पुराणे, इतिवृत्त, आख्यायिका, उदाहरण, धर्मशास्त्र व अर्थशास्त्र वाचण्याचा उपदेश करितो. तेव्हां पुराणे ही त्या वेळेस होती हे उघड आहे. पुराणे अगदी अलीकडील आहेत व त्यांत काही अर्थ नाही हे मत किती चुकीचे आहे हे यावरून ध्यानात येईल. ( अपेंडिक्स ए, स्मिथसाहेबांचे पुस्तक, तिसरी आवृत्ति.) पुराणांचा उल्लेख आपस्तंब धर्मसूत्नांत आहे. (मि. विजयचंद्र मुजूमदार, मॉडर्न रिव्ह्य, जानेवारी १९१४ पान ६७९) वैद्य त्र्यंबक गुरुनाथ काळे यांचे पुराणनिरीक्षण नांवाचे पुस्तकांत या विषयाचा फार मार्मिक विचार केला आहे.