Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

की, त्यांतील खरा कोणता व खोटा कोणता हे निश्चयाने सांगणे फार कठीण आहे. _ हिंदुस्थानच्या प्राचीन इतिहासाची साधनें मुख्यत्वेकरून आहेत ती येणेप्रमाणे: (१) लौकिकपरंपरेने चालत आलेल्या दंतकथा. (२) परदेशांच्या प्रवाशांनी दिलेली वर्णने. ( ३ ) ताम्रपट, कोरीव लेण्यांतील व शिलांवरील लेख, दानपत्रे, नाणी, वगैरे. । ( ४ ) देशांतील ग्रंथकारांनी लिहिलेले थोडे ऐतिहासिक ग्रंथ. (१) या सदरांत आपली अठरा पुराणे येतात. पुराणांत दिलेली माहिती भविष्य रूपाने दिलेली आहे. पैकी वायु, मत्स्य, विष्णु, ब्रह्मांड आणि भागवत या पांच पुराणांत राजांच्या वंशावळींच्या यादी दिल्या आहेत. सर्व पुराणांत मत्स्य हे प्राचीन आहे. मि. एफ. इ. पार्जिटर आय. सी. एस्. ह्यांनी पुराणांतील वंशावळीसंबंधाने जेवढे जेवढे श्लोक आहेत, तेवढे सर्व एका ठिकाणी छापले आहेत. पुराणांचा उल्लेख उपनिषदांत आहे, परंतु सांप्रत ती ज्या स्वरूपाची आहेत तें स्वरूप त्यांना अलीकडे आले असावें' १ एच. एच. विल्सन यांचे मत की, विष्णुपुराण इ० स० १०४५ त झाले हे आतां खोटे ठरले आहे. इ० स० १०३० त आल्बेरूनीने अठरा पुराणे असल्याचे लिहिले आहे. व त्याने स्वतः मत्स्य, आदित्य व वायु या तीन पुराणांचे भाग प्रत्यक्ष पाहिले होते. बाण कवीने हर्षचरित्र इ० स० ६२० त लिहिले. त्याने शोण नदाचे कांठचे आपले गांवीं सदृष्टीचे मुखाने वाय पुराण ऐकल्याचे लिहिले आहे. इ० स० ३०० चे सुमारास लिहिलेल्या मिलिंदपन्हा नांवाच्या जैन ग्रंथांत पुराणांचा उल्लेख केला आहे. मि० पार्जिटर यांचा ग्रंथ वेगळ्या वेगळ्या ६३ हस्तलिखित पोथ्यांची तुलना करून लिहिला आहे. त्यांचे म्हणण