________________
महाराष्ट्र, म्हैसूर, त्रावणकोर, मद्रास, ओढिया, बंगाल, बहार, अयोध्या, पंजाब, रजपुतस्थान, माळवा व नागपूर वगैरे प्रांतांतील लोक ऐकतात. सर्व देशांतील लोकांना गोवधाचा सारखाच तीव्र तिटकारा आहे. जातिनिर्बध सर्व देशभर बहुतकरून सारखेच आहेत. स्त्रियांस वागविण्याची बरीवाईट रीत व मुलींची लग्ने करण्याचा काळ बहुतेक सारखाच आहे. बहुतेक भाषांच्या मुळाशी संस्कृत भाषा आहे. धर्म, सामाजिक रीतीभाती व भाषा ह्या गोष्टी ज्या देशांतील लोकांत सारख्या आहेत, त्या देशाला तो फार अफाट आहे व त्याचे वेगळे वेगळे भागांत हवा पाण्यांत फार अंतर आहे वगैरे कारणांवरूच केवळ एक देश न म्हणणे हे युक्तीला विसंगत दिसते. त्यांतून सांप्रतकाळी तर हा सर्व देश एका साम्राज्याच्या छत्राखाली आहे. तेव्हां अशा काळी आरंभी लिहिलेले उद्गार अयोग्य आहेत यांत संशय नाही.' युरोप खंडांतील ग्रीस, इटली वगैरे प्राचीन देशांचे इतिहास त्या त्या देशांतील लोकांनी लिहिले आहेत. हिंदुस्थान देशाची गोष्ट मात्र या बाबतीत अगदी भिन्न आहे. दुसऱ्या पुष्कळ विषयांत हिंदुस्थान देशाचे वाङ्मय इतर देशांच्या वाङ्मयापेक्षा जितकें श्रेष्ठ व भरपूर आहे, तितक्याच मानानें इतिहासाच्या संबंधाने त्याच्यांत उणेपणा आहे. हिंदुस्थानच्या इतिहासाकरितां आपणाला दुसऱ्या देशाच्या तोंडाकडे पहावे लागते. काश्मिरांतील राजतरंगिणी नांवाच्या ग्रंथाशिवाय हिंदुस्थानांत म्हणण्यासारखा दुसरा ऐतिहासिक ग्रंथ नाही. रामायण व महाभारत या ग्रंथांना जरी इतिहास म्हणण्याची वहिवाट आहे, तरी त्यांत अतिशयोक्तीचा व कल्पनेचा उघड उघडपणे इतका भाग आहे १ प्रो. राधाकुमुद मुकरजीचें The Fundamental Unity of India. आहे.