Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग १ ला. भारतवर्षाच्या प्राचीन इतिहासाची साधनें. ___ वर्तमान पत्रांत कधी कधी असे उद्गार काढलेले आपल्या वाचण्यांत येतात की, हिंदुस्थान देश इतका विस्तृत आहे, त्यांतील लोकांचे भाषेत व रीतीभातींत इतके भेद आहेत की, तो एक देश नसून युरोपखंडासारखें तें एक खंड आहे. परंतु थोडा विचार केला असतां, हे मत बरोबर नाही असे ध्यानात येईल. चतुःसीमांचा विचार केला, तर असे दिसते की, ह्या देशाच्या तीन बाजूस समुद्र आहेत. उत्तर दिशेस सर्व जगतांत मोठा असा प्रचंड हिमालय पर्वत आहे. वायव्य दिशेस हिमाचलापासून तो आरबी समुद्रापर्यंत सिंधु नदी आहे. व त्या नदीच्या पलीकडे मोठमोठाल्या पर्वतांच्या रांगा आहेत, इशान्य दिशेस ब्रह्मपुत्र नद आहे. याप्रमाणे हिंदुस्थानच्या सर्व बाजूंस इतर देशांपासून भिन्न करणारी निसर्ग देवतेची महान् महान् स्पष्ट निशाणे आहेत. तसेच या चतुःसीमांच्या आंत राहणाऱ्या लोकांत में एक प्रकारचे साम्य आहे, त्या योगानं हा देश इतर देशांपासून भिन्न असल्याचे वरवर पाहणाच्या माणसाच्या सद्धां नजरेस येईल. हिंद लोकांचे संबंधाने साधारणपणे पाहिले तर, काश्मीर प्रांतांत ज्या देवांची पूजा करितात त्याच देवांची पूजा कन्याकमारीच्या भशिरापाशी राहणारे लोक करितात. पश्चिमेच्या टोकास असलेल्या द्वारका क्षेत्रीं ज्या कृष्ण देवाची भक्ति लोक करितात त्याच कृष्ण देवाची भक्ति पूर्वकडील बंगाल देशांत व जगन्नाथपुरी क्षेत्रांत करितात. रामायण, महाभारतातील कथा नेपाळ व हिमालयांतील इतर प्रांत यांतील लोक जितक्या आवडीने ऐकतात तितक्याच आवडीने काठेवाड, गुजराथ,