Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

बहार प्रांतापावेतों त्याने सर्व उत्तर हिंदुस्थानांत आपला अंमल बसविला. दक्षिणेत आंध्र राज्य स्थापन झाले. चोल, चेर व पांडव राज्य स्थापन होऊन कांचीस प्रसिद्ध विद्यापीठ निघाले. ब्राह्मणे व आरण्यकें यांतील केवळ तांत्रिक ग्रंथांचे ठिकाणी सूत्रे झाली. यास्कानें निरुक्त केले. पाणिनीने आपला प्रसिद्ध व्याकरणाचा ग्रंथ याच काळांत केला. सांख्य व इतर दर्शने झाली. व गौतम बुद्धाने बौद्ध धर्माची स्थापना केली. ___ मौर्य वंशाचे सुमारापासूनचा संक्षिप्त इतिहास पुढील लेखांत येईलच. तेव्हां त्याबद्दल येथे काही लिहिण्याची आवश्यकता नाही. PORNTRA