________________
पूजाअर्चा आपआपले आश्रमांत लोक करीत असत. कुळांतील आश्रमात लोक करीत असत. कुळाताल पराक्रमी पुरुष तो राजा होई. त्याचे जवळ मंत्र म्हणणारे व यज्ञयाग करणारे ब्राह्मण असत. परंतु त्या वेळेस वेगवेगळ्या जाती झालेल्या नव्हत्या.' इ. स. पू. २०००-१४०० ) ___ कालांतराने आर्य लोक गंगानदीचे सुपीक प्रदेशांत आले, तेव्हां त्यांचे धर्मात व संस्कृतीत बदल झाला. त्यांचा आरंभींचा जोम कमी होत गेला. ऐषआराम वाढले. शौर्याचे ऐवजी वाङ्मय, धार्मिक विचार वृद्धिंगत पावले. मंत्रतंत्राचे महत्त्व जास्त वाढले. आरंभी रचलेलें मंत्रांचे खरे रहस्य समजेनासे झाले व मंत्रसंख्याही फार वाढल्यामुळे इतकें पाठ करणे म्हणजे एक स्वतंत्र कामच झाले. साधारण माणसांच्या हातून ते होणे अशक्य झाले. स्वतंत्र ब्राह्मणवर्ग उत्पन्न झाला. ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन जातीमधील भेद तीव्र झाले. वेदांची व्यवस्था होऊन ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्वणवेद असे भाग झाले. (इ. स. १४००-१०००) __ या वेळेस दिल्लीचे नजीक कुरूंचा देश होता. कंबोजचे आसपास पांचालांचे राज्य होते. गंगा व गंडकी नद्यांचे दरम्यानचा प्रांत कोसलांचा होता. तिरहुताजवळ विदेह लोक होते. काशी क्षेत्राजवळ काशी नांवाचे लोक होते. यानंतर म्हणजे (सुमारे इ. स. पू १०००-३२०) आर्यन लोकांची प्रगति फार झपाट्याने झाली. ते बंगाल्यांत व दक्षिण बहार प्रांतांत गल. चंद्रगुप्तानें मौर्य साम्राज्य स्थापन केले. पंजाबापासन ___१. रमेशचंद्र दत्तांचा ग्रंथ Civilisation in Ancient India Vol 1पृ. ६ २. सदर पृ. ३३ ऋग्वेदाचा मंत्रसंख्या १०,४०२ ते १०,६२२ आहे. शब्दसंख्या १,५३,८२६ व वर्ण संख्या, ४,३२,००० आहे . __ ३ देशांचे व लोकांचे नांव एकच असे.