________________
, या आर्य लोकांच्या चालीरीतींची माहिती, तसेच त्यांची सामाजिक, राजकीय व धार्मिक स्थिति वेदग्रंथावरून चांगली मिळते. हे वेद वेगवेगळ्या काळी झाले असावेत. कोणत्या काळी झाले याबद्दल तीव्र मतभेद आहे. काहींचे म्हणणे ते इ. स. पूर्वी दोन हजार वर्षांपेक्षा जुने नाहीत, तर काही विद्वानांचे म्हणणे ते इ. स. पूर्वी दहा हजार वर्षांच्या सुमारास जाहले. आर्य लोक आरंभी मोठे शूर व पराक्रमी होते. दस्यू व राक्षस यांना त्यांनी जिंकले. त्या वेळच्या मंत्रांत ते आपल्या देवांना नेहमी प्रार्थना करतात की तम्ही आमची संपत्ति कीर्ति व शौर्य वाढवन दास्यंचा पराभव करा, कारण ते यज्ञ यागादि कर्मे करीत नाहीतः त्यांची तुमच्यावर श्रद्धा नाहीं; व ते मानव जातीचेही नाहीत. आर्य लोक कधी कधी आपआपसांत सुद्धां लढाया करीत असत. त्या वेळची त्यांची संस्कृति केवळ ऐहिक प्रकारची होती. आपल्यास पुष्कळ धन, गाई, अन्न, शारीरिक संपत्ति मिळावी अशा प्रकारच्याच प्रार्थना त्या काळांतील मंत्रांत आढळतात. सोम नांवाचे पेयाचें ते पान करीत असत. गोमांस सुद्धा ते भक्षित असत, नर्तन, वादन, यांचाही प्रघात होता. ..आरंभी आर्य व अनार्य एवढेच काय ते वर्णभेद होते. त्या वेळेस लेखनकला नव्हती. व वेदमंत्र शिष्यपरंपरेने तोंडपाठ करीत असत. मंत्र रचील त्याला ब्राह्मण हे नांव देत. युद्ध करील त्याला क्षत्रिय म्हणत. पुरुषसूक्ताचे काळापर्यंत जातिभेद तीनपणे प्रस्थापित झाल्याचे दिसत नाही. त्या वेळेस देवळे नव्हती, १ याशिवाय पिशाच, नाग, यक्ष, नीच, अपाच्य, आंध्र, पुंड्र, सांबर, पुलिंद वगैरे नांवाचे मूळचे रहिवासी होते. २. प्रसन्नकुमार बोस यांचा Epochs of Civilisation हा ग्रंथ पृ. २२९.