Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१५ शंभर वर्षांनी जी बौद्ध परिषद् झाली, ती येथेच झाली. हे शहर गंगा नदीचे कांठावर पाटलीपुत्राचे समोरचे तीरावर होते. जित पाटलीपुत्राला याचे नेहमी भय असे, व मगध राज्याचे विस्तारास हे शहर आडवें येत असे. सबब बुद्धाचे मरणा नंतर लवकरच मगध देशाचा राजा अजातशत्रु याने तें नजिनि काबीज केले. त्यामुळे मगधाचे राज्य विदेह व कोसल या प्रांतांवर पसरण्यास सोय झाली. शतद्--सतलज नदीचें वेदांतील नांव; ग्रीक झाडाड्स अगर झारा. ड्स; पंजाबच्या इतर नद्यांप्रमाणे हिचाही प्रवाह बदलला आहे. शिकंदरबादशहाचे वेळेस ती कच्छाचे रणास मिळत होती. आतां सिंधू नदीला मिळते. शूर्पारक-अपरांतांची राजधानी; सोपारें. शूरसेन-मथुरेनजीकचा प्रांत. श्रावस्ती–कोसल राज्यापैकी एक शहर; बौद्धाचे उपदेशासंबंधाने प्रसिद्ध अयोध्या प्रांतांतील गोंडा जिल्ह्यांतील सेतमहेत नांवाचे गांव. अनाथपिंडिक नांवाचे श्रीमंत सावकाराने जेत राजापासून जेतवन नांवाचा बगीचा विकत घेऊन तेथें एक मठ बांधला. तेथे राहून गौतमबुद्ध उपदेश करीत असे. जी जमीन विकत घेतली तिची किंमत त्या जमिनीवर तेव्हांची नाणी पसरून जितकी नाणी भरलीं तितकी दिली, मध्य हिंदुस्थानांतील नागोद संस्थानांतील भारहूत येथील Pon बाद्ध स्तूपावर बौद्ध स्तूपावर या गोष्टीचे चित्र कोरून काढले आहे. शाक्य–हिमालयाचे पायथ्याशी ( म्हणजे सांप्रतचा नेपाळ तराई प्रांत ) राहणारी क्षत्रियांपैकी एक कुळी. गौतमबुद्ध याच कुळीपैकी होता. त्याचे उत्तरेस हिमालय पहाड; पूर्वस रोहिणी नदी, पश्चिमेस व दक्षिणेस अचिरावती ( राप्ती )