पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मालव प्रांताचा प्रतिनिधि त्याचा मुलगा अग्निमित्र होता. त्या वेळेस विदर्भ प्रांत आंध्र राजाकडे होता. विदिशा-पूर्व मालव ऊर्फ आकर प्रांताची राजधानी. विदेह-तिरहुत ऊर्फ बहार, त्याचे नैर्ऋत्य कोपऱ्यांत वैशाली संस्थान होते. विदेह व मगध प्रांताचे दरम्यान गंगा नदी होती, व कोसल प्रांताचे दरम्यान सदानीरा (गंडक नदी) होती; राजा जनकाचे राज्य; त्याची राजधानी मिथिला होती. वितस्ता-झेलम ( ग्रीक हायदास्पीज नदी ) चे ऋग्वेदांतील नांव. विपाश अथवा विपाशा-ग्रीक हायफेसिस; बिया नदी. विंध्याद्री-उत्तर व दक्षिण हिंदुस्थानची मर्यादा. वृजा--विदेह व वैशाली मिळून झालेला प्रांत. वैजयंती--उत्तर कानडा जिल्ह्यांतील वनवासी शहर; आंध्रांचे नैर्ऋत्य प्रांताची राजधानी; नंतर शाटकर्णीचे चुटू कुळाकडे गेले. त्यानंतर कदंबाकडे गेले. वैशाली–बंगाल्यांतील मुझपरपूर जिल्ह्यांत हाजीपूर तालुक्यांत बसार नांवाचे गांव. हल्ली वैशाली शहराचे ठिकाणी एक मोठा उंचवटा व अशोकाचा एक स्तंभ आहे. त्या स्तंभाचे डोक्यावर एक सिंह खोदलेला आहे. त्यावर लेख नाही. सातव्या शतकाचे आरंभी हि--उएन--त्संग आला होता, तेव्हां त्याने हा स्तंभ पाहिल्याचे लिहिले आहे. इ० स० पू० सहावे शतकांत वैशाली शहर लिछवी कुळांपैकी सरदारांचे राज्याची राजधानी होती. हे कूळ वजी जातीच्या शाखेपैकी होते. विदेह राज्य ह्या जातीपैकी हाते. वैशालीजवळ कुंडापुर (वसुकुंड) नांवाचे ठिकाण आहे. तेथे जैन धर्माचा संस्थापक वर्धमान, ज्ञानपुत्र याचा जन्म झाला. बुद्धाचे मरणानतर