पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२१६ नदी; त्याची राजधानी कपिलवस्तू होती. त्याचे शेजारी बुद्धाचे जन्मस्थान लुंबिनीवन आहे. कोसल राजांचे शाक्य मांडलिक होते. शाकल-पंजाबांतील सियालकोट शहर; मद्र लोकांची राजधानी शाकलद्वीप म्हणजे चंद्रभागा (* चिनाब ) व इरावती (रावी ) यांचे दरमानचा दुआब प्रांत. शाकलही ग्रीक लोकांचे युथिडेमस वंशाचे राजांची राजधानी. मिनांडर राजाचे राहण्याचे शहर; पांचवे शतकाचे शेवटीं हूण लोकांचे स्वारीनंतर तोरामान व त्याचा मुलगा मिहिरकुल याची राजधानी झाली. सदानीरा-विदेह व कोसल या दोन प्रांतांमधील नदी. सरस्वती–प्रसिद्ध नदी.. समतट--गंगानदीचे मुखाचे दरम्यानचा प्रदेश. सिंधुसौवीर-सिंधु प्रांत.. सुगंधवती-सौदुत्ती. सुराष्ट्र-काठेवाड व गुजराथ भाग सुरत हे नांव यापासनच नि घाले आहे.' सुवास्तु---ऋग्वेदांतील स्वात नदीचें नांव ही काबूल नदीला मिळते. सेऊणदेश-खानदेश. सेमुला-चेंबूर किंवा चोल. हस्तिनापूर-धृतराष्ट्राची राजधानी, भागीरथीच्या काठी. हिमालय-हिमवंत [ ऋग्वेद ], इमाऊस, हिमाऊस, हेमोडस ही ग्रीक नांवें होत. भारतवर्षातील मुख्य पर्वत महेंद्र मउय, १असे प्रो० याफ्सन् यांचे मत आहे. परंतु याबद्दल शका आहे.