Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/253

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

मंदगोर-मादापुर ( राजापुरचेः खाडीवर ).7 मत्स्य ऋग्वेदांत या लोकांचे नांव आढळते. महाभारताचे वेळेस मत्स्य लोक कुरूंचे दक्षिणेस व शूरसेनाचे पश्चिमेस राहात असत. हल्लींचे अलवार संस्थानच्या जागी ते होते. मालव ऊर्फ माळवा-याचे पश्चिम व पूर्व असे दोन भाग आहेत. पश्चिम म्हणजे अवंति ( राजधानी उज्जनी); पूर्व ऊर्फ आकार ( राजधानी विदिशा ऊर्फ भेलसा); पर्वी पंजाबांत मालव व मलय या नांवांचे लोक राहत असत. शिकंदर बादशहाचे वेळचे माली लोक. मिथिला विदेहाची राजधानी; जनक राजाचे स्थान. मैरिंज मिरज. यमुना प्रसिद्ध नदी; ऋग्वेदांत तीन वेळ तिचा उल्लेख आहे. राजगृह---पहा मगध. रोहिणी-पहा शाक्य. लंका-हा शब्द कधी सर्व गीलोन बेटास लावतात, कधी कधी फक्त राजधानीस लावतात. लिछवी-वृनी लोकांपैकी एक पोटभाग. वलवाट-वलवडे ( कोल्हापूर भागांत ). वंग-बंगाल प्रांत. वत्स-प्रयाग प्रांत; त्याची राजधानी कौशांबी होती. वातापीपुर-बदामी. विदर्भ-व-हाड प्रांत; दमयंतीचा पिता भीमराजा याचे राज्य. कालिदासाचे मालविकाग्निमित्रांत मगध व विदर्भ यांचे दरम्यानच्या युद्धाची हकीकत आहे. इ० स० पू० दुसरे शतकांत मगध देशचा राजा. पुष्पमित्र शुंग हा होता.