________________
ब्रह्मावर्त--सरस्वती व दृषद्वती नद्यांचे दरम्यानचा प्रांत; हल्लीचा सिरहिंद प्रांत; कुरुक्षेत्राचा भाग. दक्षिणेन सरस्वत्या दृषद्वत्त्युत्तरेण च । ये वसंति कुरुक्षेत्रे ते वसंति त्रिविष्टपम् ॥ भृगुकच्छ-भगु राजाचा किनारा; ( किंवा भृगु ऋषीचे नजीकचे स्थान; ) भडोच; ग्रीक बरूगझ.. मंगध-दक्षिणबहार; मौर्य वंशाचे राज्य, हा देश पुन्हां गुप्त कारकीर्दीत उदयास आला; पूर्वीची राजधानी राजगृह होती. नंतर पाटलिपुत्र झाली. *मथुरा-आग्रा भागांतील प्रसिद्ध नगर; यमुनेच्या काठी; शूर सनांची राजधानी; इ० स० पू० दुसरे शतकांत वेगळ वेगळे राजांचे ताव्यांत होते. इ०स० पू०१०० वे वर्षों शर्क क्षत्रपांचे ताब्यात गेले. कुशनाचे कारकीदीत जैन धर्माचं • महत्त्वाचे स्थान होते. मध्यदेश--आर्यावर्ताचा भाग; हिमालय व विंध्या पर्वताचे दर म्यानचा देश; त्याचे पूर्वेस प्रयाग व पश्चिमेस विनशन म्हणजे जेथें सरस्वती वालुकायम प्रदेशांत गुप्त होते, ते ठिकाण. महानदी--प्रसिद्ध नदी; कलिंग राज्याची उत्तर सीमा. महाराष्ट्र—अशोकाचे लेखांत त्यांना रथिक ( संस्कृत राष्ट्रिक ) असे म्हटले आहे. पिटेनी ( पैठणचे लोक ) यांचे जोडीने त्यांचा उल्लेख आहे. मंगलवेष्टक-मंगळवेढे ( पंढरपुराजवळ ). मरू-राजपुतान्यांतील थरचे मोठे वाळवंट.
- मधु ' राक्षसास ठार मारून शत्रुघ्नाने हे शहर वसावले म्हणून मधुरा. ' द्विरूप कोशांत " मधुरा मथुरा समे" असा चरण आहे.