पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२११ पलइपटमई–पाल ( महाडाजवळ ). पल्लव-दक्षिण हिंदुस्थानांतील लोक; राजधानी कांची ऊर्फ कांचीपुरम् ; यास इंग्रज लोक कांजीवरम् असे म्हणतात. प्रतिष्ठान–पैठण; गोदावरी नदीचे कांठी; आंध्र राज्याच्या पश्चिम _भागाची राजधानी. प्रयाग-गंगा, यमुना व सरस्वती नद्यांचा प्रसिद्ध त्रिवेणी संगम अक्षय वटाचे स्थान. मुसलमान ह्या स्थलास अलहाबाद म्हणतात. पाटलिपुत्र-पाटणा; ह्याचे वर्णन मेगेस्थेनीजने दिले आहे. पेटेनिक--पैठण. पांचाळ--ऋग्वेदांतील कृवी लोक;नांवावरून पांच लोक मिळून एक लोकझाले असावेत असे दिसते. यांत दक्षिण पांचाळ व उत्तर पांचाळ असे दोन देश होते;गंगेच्या पूर्वेस अयोध्येच्या वायव्येस असणारे ते उत्तर पांचाळ, यमुना व गंगा नदीचे दरम्यान व कुरु व शूरसेन यांचे पूर्वेस व नैर्ऋत्येस असणारे ते दक्षिण पांचाळ. उत्तर पांचाळांची राजधानी अहिच्छत्र. अद्याप बरेली जिल्ह्यांत रामनगरजवळ त्या नांवाची जागा आहे. दक्षिण पांचाळांची राजधानी कांपिल्य होती. फरकाबाद जिल्ह्यांत कांपील गांवाजवळ तें होतें. पांडय-मदुरा व तिनेवल्ली जिल्ह्यांत हे लोक राहात होते. अशो काचे लेखांत व ग्रीक व लॅटिन ग्रंथांत त्यांचे नांव आहे. ब्रह्मर्षिदेश--कुरु, मत्स्य, पांचाळ व शूरसेन लोकांचा प्रांत; ब्रह्म र्षिचा देश; गंगा व यमुना या नद्यांच्या दरम्यानचा प्रांत पतिआला व दिल्ली भागाचा पूर्व भाग.