________________
जवळ त्या शहराच्या पडझडीच्या खुणा आहेत. या ठिकाणी प्राचीन प्रसिद्ध पाठशाळा होती. तेथें वेद व कला शिकवीत असत; हे शिकंदराचे वेळेस एक स्वतंत्र #. संस्थान होते. कधी कधी गांधार देशाचा भाग असे. तापी-प्रसिद्ध नदी. ताम्रपर्णी-सीलोनमधील एक शहर; कधी कधी संबंध बेटालाही हे नांव लावतात. अशोकाचे लेखांत व पालिभाषेत तंबपण्णी हे त्याचे रूप आहे. ग्रीक व लॅटिन ग्रंथांत य्याप्रोबेन हे रूप आहे. ताम्रपर्णी म्हणून एक तिनेवल्ली जिल्ह्यांत नदी आहे. दक्षिणापथ–दक्षिण देश; डेक्कन. दृषद्वती--सिरहिंद प्रांतांतील नदी; सांप्रतची चऊतुंग. धान्यकटक-आंध्रदेशाच्या राजधान्यांपैकी एक राजधानी. ___ अमरावतीनजीक. द्वारसमुद्र-हँसुरांतील हळेबीड गांव. नर्मदा–प्रसिद्ध नदी. निषध-विंध्याद्रीचे दक्षिणेस प्राचीन राज्य होते. माळव्याचे - दक्षिणेस व विदर्भाचे वायव्येस; नळ राजाचे राज्य. परुष्णि-ह्या नदीचें नांव ऋग्वेदांत आढळते. अलीकडील संस्कृत ग्रंथांत हिला इरावती म्हणतात. ग्रीक हैड्रोआटीज. सुदासाचे युद्धासंबंधाने ऋग्वेदांत तिचें नांव आढळते. हल्ली तिला रावी हे नांव आहे. परोपानसस-अथवा परोपमिसस; हिंदुकुशचे ग्रीक नांव. इ० स० ५१६ चे बेहिस्तून येथील दरायसचे लेखांत, गांधार लोकांचे नांव आहे; सुशिअन व बाबिलोनचे लेखांत परुपरैसन्न असें नांव आहे.