Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/247

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०९ त्या राजाने मनुष्य व पशु यांचेकरितां औषधालये बांध ल्याचे, झाडे लावल्याचे व विहिरी बांधल्याचे लिहिले आहे.. गिरिव्रज-ऊर्फ राजगृह; मगध देशाची प्राचीन राजधानी;पाटणा जिल्ह्यांतील राजगिर गांवांत या राजधानीच्या पडझडीच्या खुणा आहेत. गोदावरी प्रसिद्ध नदी. गोमती--सिंधु नदीस मिळणाऱ्या गुमल नदीचे ऋग्वेदांतील नांव. गोपकपट्टण-गोवें ( पोर्तुगीज लोकांचे ). चंद्रभागा--असिक्नी नदीचें नांव. चंद्रादित्यपुर-नाशीक जिल्ह्यांतील चांदोर गांव. चंपा-अंग देशाची राजधानी. चर्मण्वती-चंबळा नदी; जी यमुनेला मिळते. चेदी-ऋग्वेदांत या लोकांचे नांव आढळते. पुढे ते मध्य प्रांताचे उत्तर भागांत राहत होते. चेर- केरळ प्रांत. चोल-दक्षिण हिंदुस्थानांतील तामिल लोक. चोलमंडल यावरून पढ़ें कारोमांडेल किनारा हे नाव पडले. अशोकाचे शिला. लेखांत त्यांचे नांव आहे. महाभारतांतही त्यांचे नांव आहे. या प्रांताचा व्यापार आलेक्झांड्रिया, युरोपखंड व रोम शहर ह्यांशी होता. दक्षिण हिंदुस्थानांत जी नाणी सांपडली त्यांत क्लॉडिअस बादशाहाने ब्रिटन देश काबीज केला ( इ. स. ४१-१४) तेव्हां जी नाणी पाडली त्यांपैकी नाणे सांपडले. इंग्रजी शब्द पेप्पर ( मिरी ) हा तामिल पिप्पली ( ग्रीक पेपरी ) या शब्दापासून निघाला आहे. यावरूनही हा व्यापार चालू असल्याचे सिद्ध होते. तक्षशिला-ग्रीक नांव तक्षिला; रावळपिंडी जिल्ह्यांत शहाढेरी