________________
२०७ कृवी-पांचालांचे ऋग्वेदांतील नांव. कृष्णा--प्रसिद्ध नदी. कांपिल्य--दक्षिण पांचाळ देशाची राजधानी; फरकाबाद जिल्ह्यां तील कांपिलगांवांत प्राचीन राजधानीच्या खुणा आहेत: द्रुपद राजाची राजधानी. कामरुप--आसाम. कावेरी--दक्षिण हिंदुस्थानांतील प्रसिद्ध नदी. काशी--ह्या राज्यासंबंधाने कोसल व विदेह राजांचे दरम्यान नेहमी लढाया होत असत. कुभा-ऋग्वेदांतील काबूल नदीचे नांव. कुरु-ब्राह्मण ग्रंथांचे वेळचे प्रसिद्ध लोक; कुरुक्षेत्र म्हणजे पति आला संस्थान व दिल्ली प्रांताचा पूर्वेकडील निमा भाग ब्रह्मावर्त प्रांत याचे वायव्य सरहद्दीवर होता; पूर्वेस यमुना नदी होती. त्याची प्राचीन राजधानी हस्तिनापूर होती; दुआबचा उत्तर भाग त्यांचेकडे होता. पूर्वेस उत्तर पाञ्चाळ व दक्षिणेस दक्षिण पाञ्चाळ लोक होते. त्यांची नंतरची राजधानी इंद्रप्रस्थ होती. इंद्रप्रस्थ पांडवांनी यमुनेच्या कांठी स्थापन केलें. केरळ-मलबार, कोचीन व त्रावणकोर प्रांत. केरळपुत्र हे त्या देशाच्या राजाचें नांव असल्याचे अशोकाच्या लेखावरून दिसते; यासच चेर म्हणतात. कोंगूदेश-मद्रास इलाख्यांतील सालेम व कोइमतूर जिल्हे. कोसल-पांचालाचे पूर्वेचा व विदेहाचे पश्चिमेचा देश; सांप्रतचा अयोध्याप्रांत; यांत अयोध्या ऊर्फ साकेत व श्रावस्ती ही मुख्य शहरे होती.