Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०६ गेले, व दक्षिण आणि पश्चिम यांच्या दरम्यानचे राज्य कदंब लोकांकडे गेले. आंध्रांची मुख्य शहरें अमरावती प्रतिष्ठान, व वैजयंति ही होती. इरावती-परुष्णी ( ऋग्वेद ); हैड्राओटीज ( ग्रीक ), इरावती (संस्कृत) सांप्रतचे नांव रावी. उज्जनी--क्षिप्रा नदीचे कांठी; ही नदी चंबळा नदीला मिळत; अवंती ऊर्फ पश्चिम माळव्याची राजधानी; मौर्य व गुप्त साम्राज्याचे प्रतिनिधींची राजधानी; शारक ( सोपारा ) भगकच्छ ( भडोच ) व श्रावस्ती यांपासून येणारे मोठे रह दारीचे रस्ते या ठिकाणी मिळत असल्याकारणाने हे मा० व्यापाराचे शहर होते. विद्या व शास्त्र यांचेही पीठ होतः हिंदु ज्योतिषी रेखांश येथून मोजीत असत. कच्छ--तीर किंवा किनारा; मूळ संस्कृत शब्द कक्ष ( सरहद्द ): कपिलवस्तू-शाक्यांची राजधानी; बुद्धाचे जन्मस्थान; लुबिना वनाजवळ सन १८९६ वर्षात नेपाळच्या तराई प्रातात रुम्मिनदेई नांवाचे गांवीं अशोकानें स्थापिलेला एक स्तम सांपडला. त्यावरील प्रत्येक अक्षर अद्यापपावेतों पूर्णपण स्पष्ट सुवाच्य आहे. त्यावरून कपिलवस्तू व लुंबिनी वना जागा निश्चित होते. कलिंग--महानदी व गोदावरी ह्या नद्यांचे दरम्यानचा पूर्वेकडाल किनाऱ्यावरील प्रांत. हा अशोकाने घेतला होता. पुढे मा साम्राज्य क्षीण झाल्यानंतर तो प्रांत स्वतंत्र झाला अ कलिंग देशाचा राजा खारवेल याचे कटकजवळील हाय गुंफा गुहेतील लेखावरून समजतें. खारवेल हा इ. स. पू. १५० वे वर्षों राज्य करीत होता. कन्हाटक-सातारा जिल्ह्यांतील क-हाड.