Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२०५ बौद्ध ग्रंथांत साकेत ही कोसल राज्याची राजधानी असल्याचे लिहिले आहे. अयोध्या आणि साकेत ही एकच असावीत. अवंती-पश्चिम मालव ऊर्फ माळवा ह्या देशाची राजधानी; हि लाच उज्जयिनी अथवा उजनी असे म्हणतात. ही प्रसिद्ध सप्तपुयांपैकी एक होय. असिक्नी--वेदांतील काळी नदी. तिला पुढे चंद्रभागा म्हणं लागले. शिकंदराच्या वेळचें नांव अकिसिनी (चिनाब ) चंद्रभागा नांवाचे ग्रीक रूप सँड्रोफेगस (शिकंदराचे भक्षण करणारी ) असे असल्यामुळे शिकंदराने ते बदलून प्राचीन नांव असिक्नी असे ठेवले. त्याचे ग्रीक रूप असेसिनीज असे होते, व त्याचा अर्थ आरोग्यदायक असा होता. अंग-उत्तर बंगाल्यांतील मोंगीर व भागलपूर प्रांत; राजधानी चंपा ( भागलपुरा नजीक ) आकार-पूर्व मालव ऊर्फ मालवा देश. आर्यावर्त--हिमालय आणि विंध्य पर्वत यांच्या मधील पूर्व समुद्रा पासून पश्चिम समुद्रापर्यंतचा देश. आंध्र--कृष्णा व गोदावरी ह्या नद्यांचे दरम्यान हे लोक रहात होते. ऐतरेय ब्राह्मणांत त्यांचे नांव आढळते. अशोक रा. जाचे ते मांडलिक होते. त्या राजाच्या मरणानंतर त्यांची सत्ता वाढली; ती पश्चिम दिशेकडे नाशिकापर्यंत वाढली. त्यांच्यांत शातवाहन वंश प्रसिद्ध होता. त्यांचे राजास शातकर्णी म्हणत असत. त्या वंशाचे राज्य खि०पू०२२० वर्षांपासून तों इ० स० २४० वर्षांपावतों होतें. एवढ्या काळांत त्यांचे तीस राजे झाले. त्यांची एक शाखा आंध्रभृत्य म्हणून झाली. तेव्हापासून आंध्र सत्ता कमी होऊ लागली. आंध्रभृत्यांचे पश्चिमेकडील राज्य अभीर लोकांकडे