________________
१९४ झाला होता असे दिसते. दुसरे दोन ब्राह्मणांची उपनांवें घैसास अशी आहेत. या राजाचे कारकीर्दीत सोमदेव नांवाचे जैन पंडितानें पूज्यपादाचे व्याकरणावर शब्दार्णवचंद्रिका नांवाची टीका लिहिली आहे. कोल्हापुरचे राजे बहुतेक स्वतंत्र होते. परंतु त्यांना आपले मांडलिक करण्याचे उद्देशाने विज्जनाने आपले वधापूर्वी भोजावर स्वारी केली. देवगिरीस यादवांची सत्ता कायम झाल्यावर भोजानें पूर्णपणे स्वतंत्र होण्याचा यत्न केला. परंतु सिंघणाने त्याचा पूर्ण पराभव केला व त्याने राज्य आपल्या राज्यांत सामील केले. ही कोल्हापुरची शाखा इ० स० ९५९ त स्थापन झाली असावी. त्या वेळेस तिसरा कृष्ण हा राष्ट्रकूट राजा होता. ___ या शिलाहारांची भक्ति पुराण व वेद यांतील देवतांवर विशेष होती. त्यांच्या विरुदांपैकी श्रीमन्महालक्ष्मीलब्धवरप्रसाद हे एक होते. यावरून महालक्ष्मी हे त्यांचे कुलदैवत होते असे दिसते. तथापि ते ब्राह्मण, जैन व बौद्ध या सर्व धर्माचा परामर्ष घेत होते, हे त्यांच्या वर दिलेल्या वर्णनावरून दिसून येईल. ____हल्ली शेलार उपनांवाची पुष्कळ मराठी कुटुंबे आहेत. पुण्याजवळील चिंचवड क्षेत्रापुढील शेलारवाडी नांवाचे आगगाडीचे जे स्टेशन आहे, ते कदाचित् प्राचीन तगर राजांचे वंशजाचे नांवावरून पडले असावें. महत्त्वाच्या गोष्टींची अजमासाने सालें. खि० पू० ६०२-शैशुनाग वंशाच्या राज्याची स्थापना. ९३०-बिंबसाराचे राज्यारोहण. ५९९-५२७-जैनधर्माचा संस्थापक वर्धमान महावीर. ५६०-४८७-गौतमबुद्ध बौद्ध धर्माचा संस्थापक.