पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

यांपैकी गोंक हा बेळगांव जिल्हांतील गोकळहाटकुंडी व मैरिज (मिरज ) या भागावर राज्य करीत होता. त्याच्या तीन बंधूंपैकी गूवल हा त्याचे मागाहून गादीवर बसला. गूवलानंतर गोंकचा मुलगा मारसिंह हा राज्यारूढ झाला. त्याने पुष्कळ मंदिरें बांधली. त्याची राजधानी खिलिजिळी नांवाचे किल्ल्यांत होती. हे पन्हाळ्याचे तेव्हांचे नांव होते. मारसिंहाचे मुलांपैकी गण्डरादित्य हा विशेष प्रसिद्ध होता. तो मिरिंज भागावर व कोंकणावर राज्य करीत होता. यावरून कोल्हापुरचे शिलाहारांनी कोंकणप्रांत १०३२ वे वर्षापूर्वी जिंकला असावा. गंण्डरादित्याने प्रयाग नांवाचे गांवीं एक लक्ष ब्राह्मणभोजन घातले. हे प्रयाग गांव कोल्हापुराजवळ होते. त्याने आंजरें येथे एक जैन मंदिर बांधलें; मिरज प्रांतांतील हरकुडी गांवीं गण्ड. समुद्र नांवाचा एक मोठा तलाव बांधल्या व त्याचे कांठी शिव, व बुद्ध, व अहत ( जिन ) यांच्या मूर्ति स्थापिल्या व त्या प्रत्येक देवाकरितां जमिनी दिल्या. तो फार उदार व धार्मिक होता. तो प्रथम तिरवाड येथे व नंतर वलवाट नांवाचे गांवीं रहात होता. या गांवाचें सांप्रतचे नांव बलवडें असें आहे. गण्डरादित्याचा मुलगा विजयार्क याने विज्जन कलचरी यास साह्य केले व त्या योगाने त्यास स्वतंत्र सत्ता मिळाली ( इ० स० ११५७ ). विजयार्कानंतर दुसरा भोज हा पन्हाळ्याचा महामंडलेश्वर झाला. त्याने त्याचा मुलगा गण्डरादित्य याचे विनंतीवरून ब्राह्म. णांचे अन्नछत्राकरतां कोंकणांतील खारेपाटणाजवळील कशेळी हा गांव इनाम दिला. हिंदु व जैन मंदिरास त्याने जमिनी दिल्या. ज्या ब्राह्मणांस त्याने दाने दिली त्यांत दोघांस कन्हाटक असे म्हटले आहे. यावरून तेव्हां ब्राह्मणांतील क-हाडे हा वर्ग पूर्णपणे स्थापन १३