________________
१९२ आहे. या जीमूतकेतूचा मुलगा जीमूतवाहन नांवाचा होता. त्या जीमूतवाहनापासून शिलार ऊर्फ शिलाहार वंश उत्पन्न झाला अशी दंतकथा आहे. या वंशाच्या तीन शाखा झाल्या. या सर्व शाखांचे राजास तगरपुरवराधीश्वर असें विरुद्ध होते. हे तगर नगर पूर्वी फार प्रसिद्ध होते. परंतु ते कोठे होते हैं अद्यापि खात्रीने निश्चित झालेले नाही. ___ या तीन शाखांपैकी एक शाखा उत्तर कोंकणांत होती. दुसरी दक्षिण कोंकणांत होती. तिसरी शाखा कोल्हापुर, मिरज व क-हाड या भागावर राज्य करीत होती. पुढे दक्षिण कोंकणही त्यांचे सत्तेखाली आले. या शाखेतील पहिला राजा जतिग नांवाचा होता; व त्या शाखेची वंशावळ येणेप्रमाणे आहे: जतिग नाइम्म चंद्रराज दुसरा जतिग गोंक गूल गूवल कीर्तिराज चंद्रादित्य मारसिंह (इ०स०१०५८) दुसरा गूवल भोज बल्लाळ गण्डरादित्य (१११०,१११८,११२५/ विजयार्क ( ११४३,११५१) दुसरा भोज ( ११७९,११८७,११९०, ११९१,११९२,१२०५)