Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

रामचंद्राची कांहींच तयारी नव्हती सबब त्याने तहाचे बोलणे लावलें. अल्लाउद्दिननेंही तें कबूल केले. परंतु रामचंद्राचा मुलगा शंकर हा कांहीं सैन्य एकत्र करून अल्लाउद्दिनावर चाल करून आला. अल्लाउद्दिन त्याला सामना देण्यास गेला. शंकरचे सैन्य जास्त होते व त्याला जय मिळण्याचा संभव होता. परंतु अल्लाउदिनने गडाजवळील सैन्यापैकी काही सैन्य आपल्या मदतीस बोलाविलें. शंकराला वाटले की, अल्लाउद्दिनचे मोठे सैन्य दिल्लीकडून येण्याचा त्याने जो बोभाटा ऐकला होता तेंच हे सैन्य असावे. यामुळे हिंदु सैन्य घाबरून गेलें व सैरावैरा पळू लागले व शंकराचा पूर्ण पराभव झाला. तेव्हां अल्लाउदिनने आपल्या मागण्या वाढविल्या व शेवटी रामचंद्राने त्याला सहाशे मण मोती, दोन मण रत्ने, एक हजार मण चांदी, चार हजार रेशमी कपडे व दुसऱ्या मौल्यवान जिनसा दिल्या व दरसाल दिल्लीस खंडणी पाठविण्याचे कबूल केले, तेव्हां अल्लाउद्दिन परत फिरला. ही खंडणी न आल्यामुळे अल्लाउदिनाने तीस हजार सैन्य बरोबर देऊन मलिककाफरला देवगिरीवर पाठविले. त्याने रामचंद्राचा पराभव करून त्यास दिल्लीस आणले. तेथे त्यास सहा महिने ठेऊन सोडून दिले. रामचंद्रानंतर त्याचा मुलगा शंकर गादीवर बसला. तो खंडणी देईना तेव्हां त्याजवर स्वारी करून मलिककाफरने त्यास ठार मारले व आपली देवगिरी येथे कायमची वस्ती केली. ___ अल्लाउद्दिनचे मरणानंतर रामचंद्राचा जावई हरपाळ याने बंड केले. परंतु अल्लाउदिनचा मुलगा मुबारिक याने त्यास कैद केले, व त्यास जिवंत जाळले. याप्रमाणे दक्षिणेतील हिंदु राज्यांचा शेवट -झाला. ( इ० स० १३१८ ).