________________
१८९ गांवांत वेश्यांना राहूं देऊं नये; घृत होऊ देऊ नये; शस्त्रांचा उपयोग करूं नये; व आपला कालक्षेप सत्कार्यात करावा. हेमाद्रि हा महादेव व रामदेव या दोघांचाहि प्रधान होता. त्याने आपल्या धर्मशास्त्राचे ग्रंथांत आपल्यास महादेवाचा श्रीक र्णाधिप अथवा श्रीकर्णप्रभू असे म्हटले आहे. हा अधिकारी अलिकडील संस्थानांतील फडणिसाप्रमाणे होता. त्याचे बापाचें नांव कामदेव, आजाचे नांव वासुदेव, व पणजाचें नांव वामन होते. त्याचे गोत्र वत्स होते. तो विद्वान् असून शूरही होता. तो फार उदार होता. त्याने ब्राह्मणांचे धर्मविधीची व्यवस्था लावली. त्याचे ग्रंथांचें नांव चतुर्वर्गचिंतामणि असे आहे. त्यांत चार भाग आहेत. ( १ ) व्रतकांड; (२) दानकांड; (३) तीर्थकांड; व (४) मोक्षकांड. पांचवे कांडांत परशिष्ट म्हणून दिले आहे. त्यांत (१) प्रजाई देवता; (२) श्राद्ध; (३) व्रतपालनाचे दिवस; व (४) प्रायश्चित्त असे भाग आहेत. त्याने दोन टीका लिहिल्या आहेत, असा लौकिक आहे. एक वाग्भटाचे ग्रंथावर आयुर्वेदरसायन नांवाची, व दसरी बोपदेवाचे मुक्ताफल नांवाचे वैष्णव मतांचे ग्रंथावर. हा बोपदेव व हाडांतील सार्थ नांवाचे व नदीवर एक गांव आहे तेथील राहणारा होता. त्याने मुग्धबोध नांवाचा व्याकरण ग्रंथ लिहिला आहे व हरिलीला नांवाचें भागवतसार लिहिले आहे. त्याचा धनेश नांवाचा गुरु होता व त्याचा बाप केशव नांवाचा वैद्य होता. हेमाडपंती मंदिरे प्रसिद्धच आहेत. लंकेहून त्याने मोडी लिपी आणल्याची गोष्टही महाराष्ट्रांत सर्वश्रुत आहे. या रामचंद्राचेच वेळेस ज्ञानेश्वराची ज्ञानेश्वरी झाली (इ० स० १२९० ). ____ हा रामचंद्र दक्षिणेतील अखेरचा स्वतंत्र हिंदू राजा होय. अल्लाउद्दिन खिलजी इ० स० १२९४ त आठ हजार सैन्यानिशीं दक्षिणेत आला व एकाएकी थेट देवगिरीवर येऊन थडकला...