________________
वीरबल्लाळ याने चालुक्य चवथा सोमेश्वर याजवर स्वारी केली. त्यांत त्याला जय प्राप्ति झाली. काही काळानंतर उत्तरेकडील यादव व दक्षिणेकडील यादव यांची आपसांत युद्धे झाली व शेवटी दक्षिणेकडील वीरबल्लाळ याची सरशी झाली. उत्तरेकडील भिल्लम याचा पराभव झाला ( इ० स०. ११९१ चे काही दिवस पूर्वी ).. इ० स० ११९१त भिल्लमाचा मुलगा जैत्रपाळ हा गादीवर बसला. याचे राज्यांत ज्योतिषी भास्कराचार्याचा मुलगा लक्ष्मीधर हा मुख्य पंडित होता. जैत्रपाळाचा मुलगा प्रसिद्ध सिंघण हा होता. तो इ० स० १२१० त गादीवर बसला. त्याने जज्जल नांवाचे राजाचा पराभव केला व त्याचे हत्ती तो घेऊन आला.. कक्कल राजाचा त्याने पराभव केला, माळव्याचा राजा अर्जुन यास त्याने जिंकलें व भोजराजास कैद केले. गंगाधराचा मुलगा जनादन याने त्यास हस्तिशिक्षण विद्या शिकविली. वर लिहिलेला जज्जल हा छत्तिसगड देशांतील चेदि वंशाचा राजा असावा. कक्कल हा त्याच वंशाचे पश्चिम शाखेपैकी राजा आसावा; भोज हा पन्हाब्याचे शिलाहार वंशापैकी होता. या भोजाचे पराभवानंतर कोल्हापरचें राज्य यादवांनी आपल्या राज्यांत सामील केले. सिंघणाने. गुजराथेंत दोन तीन स्वाऱ्या केल्या. दक्षिणेकडे सिंघणाचा सेनापति बीचण ऊर्फ बीच याने रट्ट, गोव्याचे कदंब, कोंकणांतील गुत्त ( गुप्ताचे वंशज ) पांड्य, होयसल वगैरे राजांचा पराभव केला. ___याप्रमाणे सिंघणाचे राज्य बरेंच विस्तृत झाले. हे यादव श्रीकृप्णाचे वंशज असल्यामुळे ते आपल्यास विष्णुवंशोद्भव व द्वारावतीपुरव(श्वर म्हणवीत असत. सिंघण व त्याचे पूर्वीचे दोन राजांचे कारकीदीत श्रीकर्णाधिपाचे ( म्हणजे मुख्य चिटणीसाचे ) कामावर सोढल नांवांचा मनुष्य होता. पुढे याच कामावर हेमाद्रि यास