Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८५ देवगिरीचे यादव. या वंशाची माहिती मुख्यत्वे करून हेमाद्रीने व्रतखंड नांवाचा ग्रंथ लिहिला आहे त्यावरून मिळते. हा हेमाद्री यादव वंशांतील महादेव नांवाचे राजाचा प्रधान होता. तोच हेमाडपंत या नांवाने महाराष्ट्रांत प्रसिद्ध आहे. ___ यादव हे मूळचे मथुरेचे राजे होते.श्रीकृष्णाचे वेळी ते द्वारकेस आले. त्यांनी दृढप्रहार नांवाचे राजाचे वेळेपासून दक्षिणेत राज्य संपादन केले. हा दृढप्रहार सुबाहु नांवाचे सम्राटाचे चार मुलांपैकी दुसरा मुलगा होता. दृढप्रहाराची राजधानी चंद्रादित्यपुर [ नाशकाकडील चांदोर ] नांवाची नगरी होती. दृढप्रहराचा मुलगा सेऊणचंद्र नांवाचा होता. त्याने सेउणपूर नांवाचे नगर बसविले. तो ज्या देशावर राज्य करीत होता त्याला सेउण देश ( सांप्रतचा खानदेश ) म्हणत होते. मूळचे संस्कृत नांव बदलन गुजराथच्या अहमद बादशाहाने या देशास खानदेश असें नांव ठेवले. यादव वंशाची वंशावळ येणेप्रमाणे आहे: दृढप्रहार. सेउणचंद्र. धादियप्प. भिल्लम. राजगी ऊर्फ श्रीराज. (पान १८६ पहा.)