Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

__ या वंशाच्या लहान लहान पुष्कळ शाखा झाल्या होत्या. त्यांपैकी एकीचा पत्ता कोंकणांत लागला आहे. रत्नागिरी जिल्ह्यांतील संगमेश्वर तालुक्यांत चाळके उपनांवाची अद्याप मरा-धी) ठ्यांची घराणी आहेत. कलचूरी वंश. विज्जनानंतर त्याचा मुलगा सोम हा गादीवर बसला. सोमानंतर त्याचा [ सोमाचा ] भाऊ संकम हा बसला. त्याचे राज्यापैकी काही भाग चवथा सोमेश्वर चालुक्य याने घेतला व कलचूरी वंश नष्ट झाला (इ० स० ११८२ ). विज्जनाचे राज्य जाण्यास व त्याचा वध होण्यास बसव नांवाचा ब्राह्मण कारण झाला. त्याजकडे राजाचे द्रव्याच्या निधीच्या व्यवस्थेचे काम होते. त्याचा भाचा चेन्नवसव नांवाचा होता. त्या दोघांनी शिवाचे अर्चनाचा एक नवा प्रकार काढला. त्यांत लिंग व नंदी यांचे प्रामुख्य होते. त्यांना लवकरच पुष्कळ अनुयायी मिळाळे. त्यांपैकी कांहींना त्यांनी या नव्या धर्माचे धर्माधिकारी नेमले. त्यांना जंगम म्हणत. या जंगमांना बसव पुष्कळ द्रव्य देऊ लागला. विज्जनाचा मचण्णा नांवाचा प्रधान होता. त्याचे व बसवाचे हाडवैर होतें. मचण्णाने बसव्याच्या कागाळ्या सांगितल्यावरून विज्जनाने बसवाला कैद करण्याचा यत्न केला परंतु तो सिद्धीस गेला नाही. बसवाचे हल्लेमग व मधुवेय्य नांवाच्या दोन परम एकनिष्ठ अनुयायांचे करपणाने विज्जनाने डोळे काढले. सर्व जंगमांना राजाच्या या कृतीने फार त्वेष आला व त्यांनी राजाचा प्राण घेण्याचा निश्चय केला. जगदेव मल्लय व बोम्मय हे सशस्त्र राजवाड्यांत घुसले व राजाचे मंत्री, प्रधान, राजपुत्र यांचे समक्ष राजाचा तलवारींनी प्राण घेतला. याप्रमाणे विज्जनराजाचा अंत