पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८२ भाग आहेत. पहिल्या भागांत नवें राज्य कोणच्या उपायांनी मिळते हे लिहिले आहे. दुसऱ्या भागांत राज्य मिळाल्यानंतर त्याचे रक्षण कसे करावें; तिसऱ्या भागांत राज्य स्थाइक झाल्यानंतर राजास कोणच्या प्रकारचे भोग भोगण्यास सवड आहे; चवथ्यांत मानसिक सुखें मिळून करमणूक कशी होते; पांचव्यांत बागेत, शेतांत वगैरे ठिकाणी खेळण्याचे खेळ, स्त्रियांचे सहवासांत खेळण्याचे खेळ इत्यादि अनेक विषय आहेत. या दरएक भागाचे वीस पोट भाग आहेत. अनतापासून अलिप्त राहणे, परपीडा न करणे, शुद्ध आचरण, औदार्य, सहानुभूति, परमेश्वराचे ठिकाणी पर्णश्रद्धा, अनाथांस अन्नदान करणे व त्यांचे संरक्षण करणे वगैरे सदगुणांचे विवेचन आहे. या राजाचे अपार विद्वत्तेमुळे त्यास सर्वज्ञानभूप असें नांव मिळाले. त्याचे नंतर त्याचा मुलगा जगदेकमल्ल गादीवर बसला ( इ० स० ११३८ ). त्याने बारा वर्षे राज्य केले. नंतर त्याचा भाऊ दुसरा तैलप आला. या दोन्ही राजांचे कारकीर्दीत चालुक्यांची सत्ता क्षीण झाली. ही संधि पाहून कलचुरी वंशांतील विज्जल ऊर्फ विज्जन याने चालुक्य राज्य हस्तगत करून घेण्याचा घाट घातला. त्याने कोल्हापुरचा विजयार्क नांवाचा महामंडलेश्वर राजा व दुसरे आणखी राजे यांचे सहाय्याने तैलपास त्याची कल्याण राजधानी सोडून जावयास लावले. तेव्हां तैलप धारवाड जिल्ह्यांतील अन्निगिरि नगरांत जाऊन राहिला (इ० स० ११५७ ). काही दिवसांनी विज्जलाचा कोणी वध केला व तैलपाचा मुलगा सोमेश्वर आपल्या ब्रह्म नांवाच्या शूर सरदाराच्या मदतीने राजा झाला. परंतु हा त्यांचा जय त्यांना फार दिवस लाभला नाही. दक्षिणेतील यादवांनी ब्रह्माचा पराभव केला व चालुक्य वंशाच्या राज्याची समाप्ति झाली (इ० स० ११७२)..... .