पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/219

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

विक्रमाचे कारकीर्दीचे अखेरीचे सुमारास यादव. कुळीतील होयसल शाखेचे राजाने त्याचे राज्यावर स्वारी केली. हा राजा द्वारसमुद्र येथे राज्य करीत होता. म्हैसुरांतील सांप्रतचे हळेबीद नांवाचे जे गांव आहे त्यासच तेव्हां द्वारसमुद्र म्हणत असत. विक्रमाचा अच ऊर्फ अचगी नांवाचा शूर मांडलिक राजा होता त्याने होयसल राजाचा पूर्ण पराभव केला. विक्रमाने विक्रमपूर नांवाचे नगराची स्थापना केली व त्याचे जवळच एक भव्य विष्णु मंदीर बांधले व त्याचे समोर एक मोठा तलाव बांधला. त्याने आपल्या प्रजेचा उत्तम रीतीने सांभाळ केला. तो फार उदार होता. विद्वान् लोकांना त्याचा मोठा आश्रय होता, हे विल्हणसारख्या काश्मिर इतक्या दूर देशाहून आलेल्या पंडितास आश्रय मिळाला यावरून सिद्ध होते. विल्हणास त्याने विद्यापतीचे जागेवर नेमले. मिताक्षराचा कर्ता विज्ञानेश्वर हा त्याचेच कारकीर्दीत होता. तो कल्याणासच रहात असे. विक्रमादित्याचे राज्याची माहिती बहुतेक विल्हणाचे विक्रमांकचरित्रावरूनच मिळते. दुसरे चालुक्य वंशांत त्याच्यासारखा दुसरा मोठा राजा झाला नाही. विक्रमादित्यानंतर त्याचा मुलगा सामेश्वर गादीवर बसला .( इ०स० ११२७ ). त्याने अकरा वर्षे राज्य केले. त्याच्या राज्यांत विशेष म्हणण्यासारखी युद्धे वगैरे झाली नाहीत, परंतु त्याने मानसोल्लास ऊर्फ अभिलाषितार्थचितामाणि नांवाचा एक अलौकिक संस्कृत ग्रंथ लिहिला. हा एक विलक्षण ग्रंथ आहे.अमक्या एका विषयासंबंधाने यांत माहिती नाही, असा विषय क्वचितच. राजनीति,ज्योतिष, फलज्योतिष, तर्कशास्त्र, अलंकार शास्त्र, कविता, संगीत, चित्रकला, शिल्पशास्त्र, वैद्यक,घोडे,हत्ती,कुत्रे वगैरे जनावरांस शिकविण्याची विद्या, वगैरे विषय यांत आले आहेत. त्याचे पांच.