________________
१८० विक्रमाचे हाती सांपडला. विक्रमादित्याने त्यास पदच्युत केलें क आपण राज्यारूढ झाला. आपला धाकटा भाऊ जयसिंह यास त्याने वनवाशीचा [ सांप्रतचे उत्तर कानड्यांतील ] प्रांत दिला [इ० स० १०७८ ]. ___ या विक्रमादित्याने पन्नास वर्षे उत्तम रीतीने राज्य केले. त्यास त्रिभुवन मल्ल, कलिविक्रम, व परमादिराव अशीही नावे आहेत. त्याने करहाटक (क-हाड ) चे शिलाहार राजाची कन्या चंद्रलेखा इच्याशी विवाह केला. विक्रमाविन्याचे राज्यारोहणानंतर काही वर्षांनी त्याचा भाऊ जयसिंह याचे मनांत आपले वडील बंधूचे राज्य घेण्याचे येऊन त्याने एक मोठे बंड उभारले. विक्रमादित्याने त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला. परंतु तो सर्व व्यर्थ गेला. व शेवटी जयसिंह पुष्कळ राजांचें साह्य घेऊन कृष्णानदीचे तीरावर मोठी सैना घेऊन आला. आसपासची गांवें त्याने लुटली. पुष्कळ लोकांना कैदेत टाकले व प्रत्यक्ष राजालाही अपमानकारक निरोप पाठविले. शेवटी नाइलाज होऊन राजा त्याशी लढण्यास आला. जयसिंहाची फौज फार मोठी आहे असे त्याच्या दृष्टीस पडले.तथापि त्याने युद्ध करण्याचा निश्चय केला. प्रथमारंभीं जयसिंहाचे हत्ती विक्रमाचे सेनेवर चाल करून आले, तेव्हां त्याच्या सेनेचा बराच घोटाळा झाला. त्याचे घोडे, हत्ती व लोक परत फिरूं लागले. ही गोष्ट विक्रमाचे दृष्टीस पडली तेव्हां तो एकटाच आपल्या बेफाम झालेल्या हत्तीवर बसून शत्रूचे सैन्यावर तुटून पडला, व सारखा आपले दोन्ही बाजूंचे शत्रूचे लोकांचा संहार करीत चालला. हे त्याचे अचाट कृत्य पाहून शत्रूचे लोक भयभीत झाले व सैरावैरा पळू लागले. जयसिंह अरण्यांत लपून बसला असतांना विक्रमाचे लोकांनी त्यास धरून रानापुढे आणले. परंतु राजाने त्यास क्षमा केली.