________________
१७९ दुसऱ्या मुलांची सोमेश्वर व जयसिंह अशी नांवें होती. त्यांपैकी विक्रमादित्य हा सर्वांत ज्यास्त पराक्रमी होता म्हणन राजाचे मनांत त्यास युवराज नेमावयाचे होते. परंतु त्याने तो मान घेण्याचे नाकारले. सबब सोमेश्वरास युवराज नेमिले. परंतु सर्व अधिकार विक्रमादित्याचे हातीं होता. विक्रमादित्याने माळव्याचे राजास मदत करून त्यास पन्हा गादीवर बसविलें. गौड देशावर (बंगाल) व कामरूप (आसाम ) देशावर त्याने स्वाऱ्या केल्या; केरळ राजाला जिंकलें; सिंहल राजा त्यास शरण आला; गांगकुंड नगरी घेतली; व चोल राजा तो आल्याबरोबर पळून गेला. त्यानंतर विक्रमादित्याने कांची नगर घेऊन तें लुटले व वेंगी व चक्रकोट नगराकडे तो वळला. - याप्रमाणे विक्रमादित्य पराक्रम करीत होता तो इकडे राजास "फार भयंकर ज्वर आला व त्याने तुंगभद्रा नदीत जलसमाधि घेतली ( इ. स. १०६९). तेव्हां त्याचा ज्येष्ठ चिरंजीव सोमेश्वर हा सिंहासनारूढ झाला. विक्रमादित्य परत आला तेव्हां त्याने मिळविलेली सर्व संपत्ति आपले वडील भावाचे स्वाधीन केली. परंत सोमेश्वर हा मत्सरी व दुर्बल राजा होता. आपले भावाचे विरुद्ध तो कपट करूं लागला. विक्रमादित्याचें तो ऐकेना. तेव्हां तो आपला कनिष्ठ भाऊ जयसिंह यास बरोबर घेऊन राजधानी सोडन गेला सोमेश्वराने त्यांच्यावर सैन्य पाठविले. परंतु विक्रमादित्याने त्या सैन्याचा पराभव केला, व चोल देशाकडे गेला. तेथून तो मलय, देशाकडे वळला. कोंकणचा राजा जयकेशी याने त्यास अपार संपत्ति दिली. त्याची राजधानी गोपकपट्टण ( गो) होती. विक्रमादित्याने आणखी देश जिंकले व बहुत पराक्रम केला. शेवटी त्याचा भाऊ सोमेश्वर याने त्याच्यावर स्वारी केली. दोघां बंधूंचे मोठे युद्ध झाले. त्यांत सामेश्वराचा पराभव झाला व