पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७८ वर्णनात्मक कविरहस्य नांवाचे काव्य हलायुध नांवाचे कवीनें रचिलें आहे. . नंतरचे चालुक्य राजे. __राष्ट्रकूटांनी दुसरा कीर्तिवर्मा चालुक्य याचा पराभव करून ज्या चालुक्य वंशाची समाप्ति केली तोच वंश पुढे चालू राहिला असं मानण्यापेक्षा तैलपाने वेगळ्याच चालुक्य वंशाची स्थापना केली हे म्हणणे जास्त सयुक्तिक दिसते. कारण पूर्वीचे चालुक्य राजे आपली पूर्वपीठका हारितराजापावेतों पोचवितात, तर हे नवे चालुक्य फक्त सत्याश्रयापर्यंतच लावतात. शिवाय हे नवे चालुक्य आपल्याला जगदेकमल, त्रिभुवनमल्ल अशा पदव्या धारण करतात. पूर्वीचे चालुक्य अशा पदव्या धारण करीत नव्हते. राष्टकटांचा पराभव केल्यानंतर तैलपाने चोल व चेदीचे राजांवर स्वाऱ्या केल्या, व अन्हिलवाड्याचे मूळ राजाशी लढाई केली. परंतु त्या राजाने तैलपाचा पराभव केला, असें गुजराथी इतिहासकारांचे म्हणणे आहे. परंतु ते खरेच असेल असें खात्रीने सांगवत नाही. तैलपाने धारचे मुंज राजाचा पराभव करून त्यास बंदीत टाकलें, व त्याने सुटून जाण्यास यत्न केला तेव्हां त्याचा शिरच्छेद केला. तैलपानंतर त्याचा मुलगा सत्याश्रय गादीवर बसला. सत्याश्रयानंतर त्याचा पुतण्या विक्रमादित्य गादीवर बसला. त्याचे नंतर विक्रमादित्याचा भाऊ जयसिंह; जयासिंहानंतर त्याचा मुलगा सोमेश्वर हा राजा झाला. त्याने आपले वंशाचे वहिवाटीप्रमाणे चोल राजावर स्वाऱ्या केल्या. या सोमेश्वरास आहवमल्ल असेही म्हणतात. त्याने कल्याण (सांप्रतचे निजाम सरकारचे राज्यांत ) नगरी स्थापन केली. त्याला तीन मुलगे होते. त्यांपैकी विक्रमादित्य हाच विशेष प्रसिद्ध आहे.