Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७७ - सहावा राजा दंतिदुर्ग याने दुसरा कीर्तिवर्मा चालुक्य याचा पराभव करून महाराष्ट्राचे आधिपत्य मिळविले. त्याने कांची, कलिंग, कोसल, श्रीशैल, मालव, व लाट देशांचे राजांचा पराभव केला. तो इ. स. ७५३ नंतर मेला. त्याला मुलगा नसल्यामुळे त्याचा मामा कृष्णराज ऊर्फ अकालवर्ष ऊर्फ शुभतुंग हा गादीवर बसला. त्यानेही बराच पराक्रम केला. वेरूळ येथील कैलास लेण्याचे मंदिर त्यानेच बांधले. तो सुमारे इ० स० ७७५ त मरण पावला. नववा राजा ध्रुव ऊर्फ धारावर्ष याने कांचीचे पल्लव राजाचा, प्रयागाजवळील वत्सांचे राजाचा, व कोसल राजाचा पराभव केला. त्याचा मुलगा तिसरा गोविंद याचे कारकीर्दीत राष्ट्रकूट वंशाची ख्याती फार वाढली. एके समयीं बारा राजांनी मिळून त्याच्यावर स्वारी केली. त्या सर्वांचा त्याने मोड केला. त्या. नंतर त्याने गुजराथ व माळवा प्रांतांवर स्वाऱ्या केल्या. तेथून तो विंध्याद्रीपर्वताकडे वळला. तेथील माराशव नांवाचा राजा त्याला शरण आला. पर्जन्य काळानंतर तो तुंगभद्रा नदीकडे आला, व पल्लव राजाचा पुरा मोड केला. तेथून त्याने वेंगीचे राजास आज्ञापत्र पाठविल्यावरून तो राजा त्यास शरण आला. लाटदेश त्याने आपला भाऊ इंद्र यास दिला. याच गोविंद राजाला प्रभूतवर्ष व पृथ्वीवल्लभ असे म्हणतात. या वशांतील शेवटचा राजा ककल नांवाचा होता. तो शर योद्धा होता. परंतु चालुक्य वंशाचा तैलप राजा याने त्याचा पराभव केला व राष्ट्रकूट वंशाचे राज्य चालुक्याचे हातीं गेलें. (इ.स.९७३) __ या वंशाचे राज्यांत शिव, विष्णु वगैरे पौराणिक देवांची पुष्कळ भव्य मंदिरे बांधण्यात आली. बौद्ध धर्माची महती कमी झाली. जैन धर्मास बरेच उत्तेजन मिळाळें. अमोघवर्षाने तो धर्म कदाचित् स्वीकारलाही असावा.या वंशांतील एका कृष्ण राजाचे