पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७४ गादीवर बसला, त्याचे राज्याचे आरंभी कांचीचा पल्लव राजा व चोल, पाण्ड्य व केरळ देशांचे राजांनी त्याचा अंमल झुगारून देण्याचा प्रयत्न केला, परंतु विक्रमादित्याने त्यांचा पराभव करून त्यांना शरण येण्यास लाविलें. विक्रमादित्याने गुजराथेतील राज्यावर आपला भाऊ जयसिंहवर्मा धाराश्रय यास नेमिलें. विक्रमादित्यानंतर त्याचा मुलगा विनयादित्य व विनयादित्यानंतर त्याचा मलगा (म्हणजे विक्रमादित्याचा नातू) विजयादित्य हे गादीवर बसले. - विजयादित्याचा मुलगा दुसरा विक्रमादित्य इ० स० ७३३ मध्ये गादीवर बसला. राज्याभिषेकानंतर लवकरच त्याला पल्लव राजा नंदिपोतवर्मा याच्याशी युद्ध करावे लागले. त्याचा पराभव झाल्यानंतर चोल, पाण्ड्य, व केरळ यांच्याशी त्याने लढाया करून त्यांचा पराभव केला. विक्रमादित्याने चौदा वर्षे राज्य केले. त्याचे पश्चात् त्याचा मुलगा कीर्तिवर्मा हा गादीवर बसला. त्याचे कारकीर्दीत चालुक्यांची महाराष्ट्रावरील सत्ता नाहीशी होऊन ती राष्ट्रकुटांचे राजाकडे गेली. या राष्ट्रकूट राजाचे नांव दंतिदुर्ग असे होते. त्याचे पश्चात् कृष्ण नांवाचा राजा झाला. या चालुक्यांचे वेळेस बौद्ध धर्मापेक्षां जैन धर्माचे प्राबल्य ज्यास्त होतें, व पौराणिक धर्मही वाढत्याप्रमाणावर होता. पहिल्या पुलकेशीनें अश्वमेध यज्ञ केल्याचे वर लिहिलेच आहे. रेवास्वामी दीक्षिताचा नातू दासस्वामी, नंदिस्वामी, लोहस्वामी, भल्लस्वामी, देवस्वामी वगैरेंना दाने केल्याचे उल्लेख आहेत. कापालिकेश्वराचे मंदिरास एक गांव दान दिल्याचे नाशिकचे लेखावरून समजते. मंगलीशाने बदामीस विष्णूचें मंदिर बांधले.