________________
शांचे राजांना त्याची नेहमीं भीति वाटे. कांचीपुर नगरीला त्याने वेढा दिला. चोल, पाण्ड्य व केरळ देशांचे राजे त्याचे मित्र झाले. ____ या राजाचेच कारकीर्दीत हुएनत्संग प्रवाशी या प्रांतांत आला. त्याने महाराष्ट्राचे वर्णन दिले आहे. त्यांत तो म्हणतो की, या राज्याचा विस्तार १२०० मैल होता. त्याचे राजधानीचा विस्तार सहा मैल होता. तेथील जमीन सुपीक असून हवा उष्ण आहे. लोक साधे व प्रामाणिक आहेत. ते कृतज्ञ आहेत, परंतु त्यांच्या कोणी वाटेस गेल्यास ते त्याचा सूड उगविण्याकरितां आपल्या प्राणाकडेही पहावयाचे नाहीत. लढाईत पळणारांचा ते पाठलाग करतात. परंतु शरणागताचे रक्षण करतात. त्यांचा सेनापति लढाई खाईल तर त्याला ते बायकांची लुगडी नेसावयास लावतात व त्याला ते प्राण द्यावयास लावतात. लढाईस जाण्याच्या वेळेस ते स्वतः दारू पिऊन धुंद होतात, व ते आपल्या हत्तींनाही दारू पाजून धुंद करतात. या पुलकेशीने इराणच्या खुसरू राजाकडे आपला वकील पाठ. विला, व त्या राजानेही त्याजकडे परत आपला वकील पाठविला.. त्याने आपला भाऊ विष्णुवर्धन ऊर्फ विषमसिद्धी याजकडे सातारा व पंढरपरचा कारभार सांगितला होता. त्या विष्णुवर्धनाने कृष्णा व गोदावरी नद्यांचे दरम्यान वेंगी येथे एक चालुक्यांची शाखा स्थापन केली. पुलकेशीचा दुसरा भाऊ जयसिंग हा नाशिकचा प्रतिनिधि होता, पुलकेशीचा ज्येष्ठ चिरंजीव चंद्रादित्य हा सावंत वाडी जिल्ह्याचा अधिकारी होता, पुलकेशीचा दुसरा मुलगा आदित्यवर्मा याजकडे कृष्णा व तुंगभद्रा नद्यांचे संगमाजवळील प्रांतांचा कारभार होता. पुलकेशीनंतर त्याचा दुसरा मुलगा विक्रमादित्य हा त्याचे