या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
________________
१७५ राष्ट्रकूट वंश. (इ. स. ७४८-९७३) राष्ट्रकूट हे यदूचे वंशांतील सात्यकी शाखेचे होते अशी दंतकथा आहे. परंतु या म्हणण्यास खात्रीलायक आधार नाही. मार्गे लिहिलेच आहे की, रजपुत कुळीपैकी र नावाचा एक संघ होता. व राष्ट्रकूट हे नांव रठ्ठ या नांवावरूनच पडले. राष्ट्रकूट वंश महाराष्ट्रांताल राजवंश होता. शातवाहन व चालुक्यांसारखें परदेशी राजांच्या स्वाऱ्यांमुळे त्यांचे राज्याचा काही दिवस लोप होत होता. परंतु पुनः ते आपले राज्य चालवीत असत. त्यांचा माहीत असलेला प्रथमचा राजा दंतिवर्मा नांवाचा होता. या वंशाचे एकंदर एकोणीस राजे झाले. त्यांचा वंशवृक्ष येणेप्रमाणे आहे: vuAIN