Jump to content

पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१७२ - बिल्हण कवीने विक्रमांक चरित्रांत चालुक्यांची उत्पत्ति दिली आहे, ती अशी. एके समयीं इंद्र ब्रह्मदेवासन्निध प्राप्त झाले, व त्यांना सांगितले की, पृथ्वीवर पाप फार झाले आहे; कोणी यज्ञयाग करीत नसल्यामुळे देवांना हवि मिळत नाही. ब्रह्मदेव त्या वेळेस संध्या करीत होते. अर्ध्यप्रधानाकरितां ओंझळीत पाणी घेतले होते. त्यांनी ओंझळी (चुळक ) कडे पाहिले तो त्यांतून एक दिव्य पुरुष उत्पन्न झाला. तोच चालुक्य वंशाचा मूळ पुरुष होय. ___ या वंशापैकी नांवलौकिकास आलेला प्रथम राजा म्हणजे जयसिंह हा होय. त्याने राष्ट्रकूटांचा पराभव केला व त्यांचा देश घेतला. त्यानंतर रणराग व पुलकेशी राजे झाले. पुलकेशीनें अश्व. मेध यज्ञ केला. त्याने वातापीपूर ( बदामी ) ही नगरी आपली राजधानी केली. त्याचे पूर्ण नांव सत्याश्रमश्रीपुलकेशीवल्लभमहाराज असे होते. त्याचे नंतर त्याचा मुलगा कीर्तिवर्मा हा गादीवर बसला. त्याने नळ (हे कोठे होते हे समजत नाही) लोकांचा व उत्तर कोंकणांतील मार्य राजे व उत्तर कानड्याचे वनवाशीचे कदंब राजाचा पराभव केला. कीर्तिवाला तिघे मुलगे होते. परंतु ते तिघे लहान असल्यामुळे त्याचा भाऊ मंगलीश हा राज्य करूं लागला. त्याने कलचुरी लोकांचा पराभव केला. त्यांचे देशाचे नांव चेदी असे होते. त्यांची राजधानी जबलपुराजवळ त्रिपुर ऊर्फ तेवूर नांवाचें नगर होते. मंगलीशानंतर कीर्तिवाचा मुलगा पुलकेशी गादीवर बसला. हा दुसरा पुलकेशी शूर व बुद्धिमान् राजा होता. त्याने राष्ट्रकु. टांचा राजा गोविंद याचा पराभव केला, व मौर्य व कदंब यांना जिंकले. शेकडों जहाजें बरोबर घेऊन त्याने पुरी शहर घेतले. लाट, माळवा, व गुरजर देशांचे राजे जिंकले. कनोजचा प्रसिद्ध राजा हर्षवर्धन याचा त्याने पराभव केला. कोसल व कलिंग दे.