________________
अथवा भरूकच ( भडोच ), कल्याण, सोपारा, सेमुला (चेंबूर किंवा चौल ), मंदगोर ( राजापुरचे खाडीवरील मांदाड ), पलईपटमई, ( महाडा जवळील पाल ) वगैरे बंदरे होती. पैठण, नगर, जुन्नर, नाशिक, कन्हाटक ( क-हाड ), टालेमाचे हिपोकरा ( कोल्हापूर ) वगैरे व्यापाराची शहरे होती. व्याजाचा दर दरसाल दर शेकडा पांच पासून साडे सात टक्के होता असे उषवदाताने दोन हजार कारशापणाचे व्याज शंभर धरले होते; व दुसरे एका ठिकाणी एक हजाराचें पाउणशे धरले होते, यावरून दिसते. ___ दरदरच्या ठिकाणी दाने दिल्याची उदाहरणे आहेत यावरून जाण्यायेण्याचे मार्ग बरेच सोईचे होते असे होते. कार्लीचे लेण्यांत वैजयंती व सोपारा येथे राहणारांनी दाने दिल्याचें; नाशिकच्या व्यापाऱ्यांनी बेदसा येथे; भरूकच्छ व कल्याणचे लोकांनी जुन्नरास; उत्तर हिंदुस्थानचे दात्याने नाशिक येथे दाने दिल्याचे लेख आहेत. ___निगम सभा ( ग्राम स्वराज्य ) असल्याचे उषवदाताचे नाशिकचे लेखांत आहे. आंध्र भत्यानंतर तीनशे वर्षांचा इतिहास बरोबर समजत नाही. काही वर्षे अमीर ( गौळी) राजांचे राज्य नाशिक व खानदेश या प्रांतांवर होते. ते सुमारे इ० स० ३०२ पावेतों होतें. बाकीच्या भागावर चालुक्यांचे राज्य होईपर्यंत राष्ट्रकूटांचे राज्य होते. हे राष्ट्रकूट म्हणजे महारठ्ठी रजपूत होत. फार प्राचीन काळापासून हे महाराष्ट्रांत आले होते. आंध्रभृत्याचे अमलांत त्यांचा अधिकार लप्तप्राय होता. आंध्रभत्त्यांची सत्ता कमी झाल्यावर पुन्हा त्यांची सत्ता सुरू झाली. मध्यंतरीं त्रैकूठ नांवाचा एक वंश होतासे दिसते. परंतु त्याबद्दल खात्रीची माहिती उपलब्ध नाही.