पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/208

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ध्रभृत्य राजाने केला. तो आर्याछंदांत आहे व त्यांत बहुतेक शृंगाराच्या गोष्टी आहेत. पैशाची भाषेत ब्रहत्कथा नांवाचा ग्रंथ याच वंशाचे वेळेस झाला. त्याच नांवाचा दुसरा ग्रंथ क्षेमेंद्र याने केला आहे. तो व सोमदेवाचा कथासरित्सागर हे दोन्ही ग्रंथ मूळच्या पैशाची ग्रंथावरून लिहिले आहेत. शातवाहनाचा प्रधान गुणाढ्य याला या गोष्टी काणभूती नांवाच्या पिशाच्याने सांगितल्या व त्या रक्ताने लिहिल्या असून त्याची सात पुस्तकें होती. ती तो राजास देत असता राजाने घेण्याचें नाकारल्यावरून त्यांपैकी सहा त्याने जाळून टाकली. पुढे राजाची इच्छा ते ग्रंथ घेण्याची झाली, तेव्हां त्यांपैकी एकच शिल्लक होते. तेच ते हे होय. कथा सरित्सागरांत कातंत्र व्याकरणाची हकीकत दिली आहे. ___ आंध्रभृत्यांचे कारकीर्दीत महाराष्ट्राची धार्मिक, सामाजिक व सांपत्तिक स्थिति... बौद्ध व ब्राह्मणी लोकांत परस्पर द्वेष अथवा वैर असल्याचे दिसत नाही. राजाकडून दोघांनाही आश्रय व उत्तेजन मिळत असे. उषवदाताने लक्षावधि ब्राह्मणांस अन्नदान दिले. गोतमीपुत्र हा ब्राह्मणांचा आश्रयदाता असल्याचे वर्णन आहे. हे दोघेही बौद्ध धर्माचे अनुयायी होते. शक व यवन हे या देशांत येऊन कायमचे रहिवासी झाले, शकांनी ब्राह्मण धर्म स्वीकारला. महाभोज, महारठी, सुवर्णकार, वर्धक, (सुतार ) धान्यकश्रेणी ( भुसारी ), गांधिक ( औषधी विकणारे ), वगैरे गृहस्थ पुष्कळ खर्च करून मोठमोठाली मंदिरे बांधीत; भिक्षेकरितां मठ बांधीत. श्रावण महिन्यांत नवी वस्त्रे परिधान करण्याचा विधि होत असे. त्याचे खर्चाकरिता धार्मिक लोक मोठमोठ्या पेढ्यांवर रकमा ठेवीत असत; त्याचे व्याजांतून पिढ्यानपिढ्या हा खर्च केला जात असे. बरूगझ