पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

तेलंगणांतील राजे.. पुळुमायी .. १९४-१५८ शिवस्कंद १६५--१७२ यज्ञश्री १७२--२०२ विजय २०२-~-२०८ चंद्रश्री २०८-२११ पुलोमवि २११--२१८ शालिवाहनाची जी आख्याइका प्रचारांत आहे ती अशी आहे. पैठणास एका कुंभाराचे घरीं एक दोन वर्षांची ब्राह्मणाची लहान मुलगी आपल्या दोन भावांसुद्धा रहात होती. एके समयीं ती गोदावरी नदीवर स्नानास गेली असतां शेष तिच्या रूपास मोहित होऊन तिच्याशी रममाण झाला. योग्य कालानंतर तिला शालिवाहन नांदाचा मुलगा झाला. तोही अर्थात् कुंभाराचेच घरी राहूं लागला. इकडे उज्जयनीस विक्रमराजा राज्य करीत होता. त्याला एका देवतेने असें भविष्य सांगितले की, तुझा मृत्यु एका दोन वर्षांचे मुलीचे मुलाचे हाताने होईल. विक्रम राजाने असा मुलगा कोठे आहे याचा तपास करण्याकरितां देशोदेशी दृत पाठविले. त्यापैकी एकाने त्यास या शालिवाहनाची खबर दिली. त्यावरून राजा सैन्य घेऊन पैठणावर स्वारी करण्यास आला. शालिवाहनाने चिखलाचे हत्ती, घोडे, व सैनिक तयार केले व त्याचा जनक शेष याने त्याला मंत्र दिला होता त्या मंत्राचे बलाने त्याने आपल्या मण्मय सेनेची प्राणप्रतिष्ठा केली व त्याने विक्रमाचा पराभव केला. . शालिवाहनाने प्राचीन मराठी भाषेत सप्तशति नांवाचा ग्रंथ केल्याची आख्याइका आहे. वास्तविक तो ग्रंथ हाल नांवाचे आं