पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

महारठ्ठ असे म्हणवू लागले. अशोकाचे दुसरे व तेरावे राजानेंत चोल, पांड्य, केतलपुत्र (चेर अथवा केरळ ) आंध्र व पुलिंद यांची नावे आहेत. यावरून पतंजलीचे कालाचे पूर्वी शंभर वर्षे तरी निदान महाराष्ट्राचे उत्तर हिंदुस्थानाशी निकट दळणवळण होतें, व महाराष्ट्रांत रट्ट व भोज राजे राज्य करीत होते असे स्पष्ट होते. भाजे, बेडसा व कार्ली या ठिकाणच्या कोरीव लेण्यांत महारठी व महारठिणी अशी दाने करणारांची नांवें सांपडतात. तसेच नानाघाट येथील गुहेत महारठी वीराचे नांव लिहिले आहे. हे लेख इ० स० चे दुसरे शतकांतील आहेत. प्राकृत भाषांपैकी मुख्य भाषेचे नांव महाराष्ट्री असे होते. सेतुबंध नांवाचे प्राकृत भाषेतील काव्य कालिदासाने लिहिल्याचा लौकिक आहे. वराहमिहिराने महाराष्ट्राचा उल्लेख केला आहे. अइहोल येथील लेखांत महाराष्ट्रांत तीन देश व नव्याणव हजार खेडी असल्याचे लिहिले आहे. हिउएनत्संग याने चालुक्याचे राज्यास महोलोच असे म्हटले आहे: तोच महाराष्ट्र देश होय. राजकीय इतिहास. चंद्रगुप्त मौर्याचे राज्याचा विस्तार काठेवाडच्या दक्षिणेस झाला नव्हता. अशोकाने कलिंग देश जिंकला. त्याचे पांचवे शासनपत्रिकेवरून राष्ट्रिका, पेटोनिक व अपरान्त देश जरी त्याचे प्रत्यक्ष राज्याचे बाहेरचे होते तरी ते त्याचे मांडलिक होते असे दिसते. विदर्भ देशांत त्या वेळेस स्वतंत्र राज्य होते. शुंगवंशीय पुष्पमित्र राजाचा मुलगा अग्निमित्र याने विदर्भपति यज्ञसेन याचा चुलत भाऊ माधवसेन याचे मध्यस्तीने त्याची बहीण मालविका आपल्याला द्यावी अशी मागणी केल्याचे मालविकाग्निमित्र नाटकांत आहे. प्रतिष्ठान ऊर्फ पैठण एथें स्वतंत्र राज्य होते.