पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

आपले दूत पाठविले त्यांपैकी विदर्भ हा एक होता. महाभारतांत अगस्ति ऋषीने तपोबलाने उत्पन्न केलेली मुलगी विदर्भ देशचे राजाजवळ ठेवल्याचा उल्लेख आहे. रामायणांतील पंचवटी नाशकासच असल्याचे अद्याप बहुमत आहे. पांड्य, चोल, केरळ या देशांचा उल्लेख रामायणांत आहे. पाणिनीचे ग्रंथांत कच्छ, अवंति, कोसल, करूष व कलिंग देशांचा उल्लेख आहे. त्यांचे दक्षिणेकडील प्रदेशांचा उल्लेख नाही. कात्यायनाचे वार्तिकांत पांड्य व चोल लोकांचा व महिष्मान देशाचा (महिष्मति नर्मदातीरी होती) व नाशिक्य नगराचा उल्लेख आहे. पतंजलीने महिष्मति, वैदर्भ, कांचीपूर, केरळ ऊर्फ मलबार यांचा उल्लेख केला आहे. पातजलीचा काळ ख्रि० पू० १५० असल्याचे आतां निश्चित झाले आहे. पाणिनीचा काल खि० पू० सातवे किंवा आठवे शतकांत असावा. कात्यायन त्यानंतर तीन चार शतकांनी झाला. ___ अशोकवर्धनाचे आज्ञापत्रांत राष्टिक, पेटोनिक (पैठण) व अपरांत ( उत्तर कोंकण ) लोकांकडे धर्मोपदेशक पाठविल्याच लिहिले आहे. हे राष्टिक ऊर्फ राष्ट्रिक म्हणजे महाराष्ट्राचे रट्ट नांवाचेच लोक असावेत. या रट्ट लोकांपैकी एका संघाने राष्ट्रकूट हैं नांव धारण केले होते व ते चालुक्यांपूर्वी महाराष्ट्रावर राज्य करीत होते. तीनशे वर्षांनी पुन्हा एकवार त्यांनी आपली सत्ता बसविली होती, परंतु पुनरपि चालुक्यांचेच वर्चस्व झाले. काही काळानंतर रट्ट राजे सुगंधवर्ती ऊर्फ सौदत्ति येथे राज्य करात होते. विदर्भ देशांतील भोज लोक ज्याप्रमाणे आपल्यांस महाभा। म्हणवू लागले, त्याप्रमाणे राष्ट्रिक, रट्टि, रवि, रठ्ठ हे आपल्या करीत होते. ती हात व ते चालल्या एका संघाने राष्ट्रकूट १ रामायण, चवथे काण्ड, अ. ४१, २ महाभारत, पर्व ३, अ ९६४९७.