पान:भारत खंडाचा प्राचीन इतिहास.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

चालुक्यांनंतर राष्ट्रकूटांनी पल्लव राजाशी लढाया सुरू केल्या. इ० स० ७७५ त ध्रुव राजानें पल्लवांचा पराभव केला, व इ० स० ८०३ साली तिसरा गोविंदराजा यानें पल्लव राजा दंतिग याचे पासून खंडणी घेतली. दहावे शतकांत गंगवाडी ऊर्फ म्हैसूरचे गंग राजे व पल्लव यांच्या लढाया झाल्या. या गंगांना पश्चिमेकडील गंग म्हणतात, व कलिंगांतील गंगांना पूर्वेकडील गंग म्हणतात. यांच्यापैकी अनंतवर्मा छोडगंग नांवाचे राजाने इ० स० १०७६ पासून इ० स० ११४७ पावेतों राज्य केले. त्यानेच पुरी येथील जगन्नाथाचें प्रसिद्ध मंदिर बांधले. शेवटी शेवटी पल्लव राजे केवळ सरदार व जहागिरदार असे बनले. सत्रावे शतकापर्यंत पल्लव सरदारांची नांवें ऐकू येतात. त्यानंतर त्यांची स्वतंत्र जात राहिली नाही. कल्लर, पल्ली व वेल्लाळ जातींत ते मिसळून गेले. पहिले पल्लव राजे बौद्ध धर्माचे होते. हस्तिवर्मा, विजयस्कंदवर्मा व विष्णुगोपवर्मा हे विष्णुभक्त होते. महेंद्रवर्मा आरंभी जैन होता. परंतु पुढे तो शैव झाला. शेवटचे पल्लव राजे शिवभक्त होते. महाराष्ट्राचा संक्षिप्त प्राचीन इतिहास. विध्याद्रीचे दक्षिणेस आर्यांचे प्रथमचे स्थान विदर्भ ( व-हाड) होते असे दिसते. अगस्ति ऋषीचा आश्रम त्या प्रदेशांत होता. रामायणांत सुग्रीवाने सीतेचा शोध करण्याकरितां ज्या देशांत